Sheep Farming : भारतात गेल्या अनेक दशकांपासून पशुपालन (Animal Husbandry) केले जात आहे. भारतात प्रामुख्याने गाय, म्हैस, शेळीचे पालन (Goat Farming) बघायला मिळत असते. मात्र आपल्या देशात मेंढीपालन (Sheep Rearing) देखील मोठ्या प्रमाणात केले जाते.
आपल्या राज्यात देखील अनेक शेतकरी बांधव (Farmer) शेतीला जोड व्यवसाय (Agricultural Business) म्हणून मेंढीपालन करत असतात. जाणकार लोक सांगतात की, इतर पशुपालन व्यवसायापेक्षा मेंढीपालन हा अधिक फायदेशीर व्यवसाय आहे.
हा व्यवसाय कमी खर्चात सुरू करता येत असल्याने शेतीसाठी हा एक चांगला पूरक व्यवसाय सिद्ध होत आहे. मित्रांनो मेंढीपालन व्यवसायातून मेंढी पालन करणाऱ्या शेतकरी बांधवांना मांस व्यतिरिक्त लोकर, खत, दूध, चामडे इत्यादी अनेक उत्पादने मिळत असतात. एकंदरीत या व्यवसायातून शेतकऱ्यांना चांगली बक्कळ कमाई होण्याची शक्यता निर्माण होते. सध्या ग्रामीण भागात शेतकरी बांधव शेती समवेत हा व्यवसाय करून भरघोस नफा कमावत आहेत.
देशात या मेंढ्यांच्या प्रजातींचे केले जात आहे संगोपन
सध्या भारतात मालपुरा, जैसलमेरी, मंडिया, मारवाडी, बिकानेरी, मारिनो, कोरिडियल रामबुटू, छोटा नागपुरी शहाबादी या प्रजातींच्या मेंढ्या मोठ्या प्रमाणात पाळल्या जात आहेत. या जातींचे संगोपन करून आपल्या देशातील शेतकरी बांधव चांगली कमाई करत आहेत.
मित्रांनो जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, साधारणत: एका मेंढीची किंमत तीन हजार रुपयांपासून ते आठ हजार रुपयांपर्यंत असू शकते. अशा परिस्थितीत ज्या शेतकरी बांधवांना मेंढीपालन व्यवसाय सुरू करायचा आहे ते शेतकरी बांधव एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीने हा व्यवसाय सहजरीत्या सुरू करू शकतात.
मेंढीसाठी आवश्यक खुराक
मेंढी हा एक शाकाहारी प्राणी आहे. हा प्राणी गवत आणि झाडे आणि वनस्पतींची हिरवी पाने खातो. अशा परिस्थितीत मेंढीला खुराकाची व्यवस्था करण्यासाठी अधिक खर्च करावा लागत नाही. शिवाय मेंढी पालन व्यवसायात पशुपालक शेतकरी बांधवांना जास्त श्रम देखील घ्यावे लागत नाही. मेंढी सुमारे 7 ते 8 वर्षे जगत असल्याची जाणकार लोकांनी माहिती दिली आहे.
एवढ्या कमी आयुष्यातही मेंढ्या शेतकऱ्यांना लाखोंचा नफा देतात. सध्या मेंढीपालनाच्या बाबतीत भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो. निश्चितच आपल्या भारतात मोठ्या प्रमाणात पशु पालन केले जात आहे. आपल्या राज्यातील शेतकरी बांधव देखील आता शेतीला जोड व्यवसाय म्हणून मेंढीपालन मोठ्या प्रमाणात करू लागले आहेत.
मेंढीपालनाचे फायदे तर जाणून घ्या
मित्रांनो अलीकडे मेंढीपालन हे ग्रामीण भागातील लोकांचे उत्पन्नाचे प्रमुख साधन बनले आहे. मेंढीपासून लोकर, मांस आणि दूध जास्त प्रमाणात मिळते. यामुळे पशुपालक शेतकरी बांधवांना देखील फायदा होतो.
याशिवाय मेंढ्याच्या लेंड्या देखील पशुपालक शेतकरी बांधवांना मिळतात जे कि अतिशय चांगले खत मानले जाते. याचा वापर करून शेतमालाची उत्पादकता वाढवता येते. मेंढ्यांच्या शरीरावर खूप मऊ आणि लांब फर असते, ज्यापासून लोकर मिळते. मेंढीच्या लोकरीपासून अनेक प्रकारचे कपडे बनवले जातात.