Farming Business Idea : अलीकडे देशात शेतीमध्ये (Farming) मोठा बदल बघायला मिळत आहे. देशातील शेतकरी बांधव (Farmer) आता चांगला नफा (Farmer Income) मिळत असल्याने नगदी पिकांच्या शेतीकडे वळत आहेत.
या नगदी पिकांमध्ये (Cash Crops) तेलबिया पिकांचा (Oilseed Crops) देखील समावेश होतो. महाराष्ट्रातील (Maharashtra) शेतकऱ्यांमध्ये देखील तेलबिया पिकांबाबतची आवड वाढली आहे.
मित्रांनो जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, तेलबियांचे उत्पादन (Oilseed Production) अनेक प्रकारे वापरले जाते. या पिकातून तेल काढण्याव्यतिरिक्त त्याचे अवशेष चारा म्हणून देखील वापरला जातो.
सहाजिकच तेलबिया पिकांची लागवड शेतकऱ्यांना दुहेरी फायदा देणारी आहे. सध्या उत्तर भारतातील बहुतांश राज्यांमध्ये तेलबियांची लागवड करून शेतकरी चांगला नफा कमावत आहेत. महाराष्ट्र प्रमुख तेलबिया उत्पादक राज्यांमध्ये समाविष्ट आहे.
तेलबिया पिकांची बाजारात आहे मोठी मागणी
मित्रांनो, तेलबिया पिकापासून काढलेल्या तेलांना बाजारात मागणी जास्त आहे. त्यामुळेच मोहरी आणि शेंगदाणा तेलाच्या दरात तेजी दिसून येत आहे. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, तेलबिया पिकांची मागणीही दिवसेंदिवस वाढत आहे.
अशा परिस्थितीत आज आपण शेतकऱ्यांना बक्कळ नफा मिळवून देणाऱ्या काही तेलबिया पिकांची माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.
भुईमूग: जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, हे भारतातील सर्वात महत्त्वाचे तेलबिया आहे. महाराष्ट्रात या पिकाची शेती विशेष उल्लेखनीय आहे. या पिकाची खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते.
तथापि, भारतात रब्बी हंगामात देखील या पिकाची पेरणी केली जाते. आपल्या राज्यातही काही भागात विशेषता बागायती भागात या पिकाची रब्बी हंगामात लागवड बघायला मिळते.
मोहरी: भुईमुगानंतर, मोहरी हे भारतातील दुसरे महत्त्वाचे तेलबिया पीक आहे. आपल्या राज्यातही मोहरीची शेती केली जाते. राज्यातील मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत याची शेती पाहायला मिळते.
या तेलाची बाजारात मोठी मागणी असते आणि चांगला बाजार भाव देखील असतो. साहजिकच या पिकाला देखील बाजारात मागणी असते आणि चांगला बाजारभाव देखील मिळतो.
तीळ: भारतामध्ये जगात सर्वाधिक तिळाचे उत्पादन घेतले जाते. आपल्या भारतात तीळ लागवडीखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे. महाराष्ट्राचा भारतातील एकूण उत्पादनात मोठा सिहाचा वाटा आहे.
याचा वापर स्वयंपाकासाठी आणि परफ्यूम आणि औषधे तयार करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत या पिकाची बाजारात मोठी मागणी असते आणि शेतकरी बांधव यातून चांगली कमाई करू शकतात.
जवस: जवसाचा वापर पेंट, वार्निश, छपाईची शाई, खाद्यतेल अर्क इत्यादी बनवण्यासाठी त्याच्या अद्वितीय सुकण्याच्या क्षमतेमुळे केला जातो. निश्चितच या पिकाची देखील शेतकरी बांधव शेती करून चांगली कमाई करू शकणार आहेत. जवस पिकाची देखील महाराष्ट्रात शेती केली जाते मात्र इतर तेलबिया पिकांच्या तुलनेत त्याचे क्षेत्र कमी आहे.
या पिकांपासून काढलेल्या तेलांना बाजारात मागणी जास्त आहे. याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होतो. यामुळेच गेल्या काही वर्षांत तेलबिया पिकांच्या लागवडीला सरकारकडून प्रोत्साहन दिले जात आहे. त्यामुळे तेलबियांच्या लागवडीखालील क्षेत्रातही वाढ झाली आहे. आपल्या महाराष्ट्रात देखील दिवसेंदिवस तेलबिया लागवडीखालील क्षेत्र वाढत आहे.