Small Business Idea : भारतात गेल्या काही वर्षांमध्ये बेरोजगारीचा दर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. बेरोजगारीमुळे ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यंत सर्वत्र नवयुवक त्रस्त आहेत. हाताला रोजगार नसल्याने उच्चशिक्षित नवयुवक तरुणांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. यामुळे अनेक नवयुवक तरुण-तरुणी आता स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहेत.
जर तुम्हीही आगामी काळात स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आज आम्ही एक बिझनेस प्लॅन घेऊन आलो आहोत. हा असा बिजनेस प्लॅन आहे जो शहरी भागात आणि ग्रामीण भागात देखील चालू शकतो.
खरंतर व्यवसाय सुरू करायचे म्हटले की यासाठी भांडवल लागते. लाखों रुपयांचे भांडवल असेल तरच व्यवसाय सुरू होऊ शकतो अशी अनेकांची धारणा आहे. मात्र असेही काही व्यवसाय आहेत जे की अवघ्या काही हजाराच्या गुंतवणुकीत सुरू होऊ शकतात.
फ्लोर मिल म्हणजेच पिठाच्या गिरणीचा व्यवसाय देखील असाच एक कमी गुंतवणूक सुरू होणारा व्यवसाय आहे. गेल्या काही वर्षांपासून भारतात पॅकिंग पिठाची मागणी वाढली आहे. मात्र असे असेल तरी आजही असे अनेक जण आहेत जे की पिठाच्या गिरणी मधून पीठ खरेदी करतात.
यामुळे तुम्हीही फ्लोर मिलचा व्यवसाय सुरू करून चांगली कमाई करू शकता. या व्यवसायाची विशेषता म्हणजे तुम्हाला व्यवसाय सुरू झाल्यानंतर अगदी पहिल्या दिवसापासूनच कमाई होणार आहे.
कसा सुरु करणार व्यवसाय?
तुम्ही हा व्यवसाय दोन प्रकारे सुरू करू शकता. हा व्यवसाय छोट्या प्रमाणावर सुरू केल्यास त्यासाठी नोंदणी आणि परवाना घेण्याची गरज भासणार नाही. जर तुम्ही मोठ्या स्तरावर हा व्यवसाय सुरू करणार असाल तर त्यासाठी तुम्हाला संपूर्ण प्रक्रिया फॉलो करून नोंदणी करावी लागेल.
एवढेच नाही तर परवानाही घ्यावा लागणार आहे. तुम्ही हा व्यवसाय ज्या ठिकाणी सर्वाधिक गर्दी असते अशा ठिकाणी म्हणजेच मार्केट एरिया मध्ये सुरू करू शकता. तुम्ही जर गावात राहत असाल तर तिथेही हा व्यवसाय सुरू करता येऊ शकतो.
किती कमाई होणार
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला सरासरी 50 हजार रुपयांपासून ते एक लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करावी लागणार आहे. जर तुमच्याकडे यासाठी भांडवल नसेल तर तुम्ही सरकारकडून कर्जही घेऊ शकता.
पिठाच्या गिरणी व्यवसायाच्या सुरुवातीच्या टप्प्यात, एक मशीन आणि इतर आवश्यक वस्तूंसाठी 50,000 ते 1 लाख रुपयांपर्यंत खर्च करावा लागू शकतो. या व्यवसायात तुम्ही दर महिन्याला मोठी कमाई करू शकता.
तुम्ही ज्वारी, बाजरी, गव्हाचे दाणे खरेदी करून त्यांचे पीठ तयार करून त्याची थेट ग्राहकांना विक्री करूनही मोठी कमाई करू शकणार आहात. या व्यवसायातून महिन्याकाठी 20 ते 30 हजार रुपयांची कमाई होऊ शकते.