Pune News : महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, शिक्षणाचे माहेरघर तथा आयटी हब म्हणून संपूर्ण देशभरात नावलौकिक मिळालेल्या पुण्यातील नागरिकांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. सध्या संपूर्ण देशभर गणेशोत्सवाचा सण सुरू आहे. गणेशोत्सवाचा हा पावन पर्व मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गल्ली पासून ते दिल्लीपर्यंत सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, या पावन पर्वाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील एसटी महामंडळाने सर्वसामान्य नागरिकांसाठी शेकडो अतिरिक्त बसेस सोडल्या आहेत.
या जादा गाड्यांमुळे एसटी प्रवाशांचा प्रवास हा निश्चितच आरामदायी झाला आहे. खरे तर दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढते. याच अनुषंगाने एसटी महामंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्रात एसटीच्या जादा गाड्या सोडल्या गेल्या होत्या.
दरम्यान आता नवरात्र उत्सवातही एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर आता एसटी महामंडळाच्या पुणे विभागाकडून नवरात्र उत्सवात देखील अतिरिक्त बसेस चालवल्या जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे विभागाकडून महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठच्या दर्शनासाठी अर्थातच कोल्हापूर, तुळजापूर, माहूर अन नाशिक जिल्ह्यातील वणीगडसाठी विशेष बस चालवली जाणार आहे. या एसटी बसेस साठी ग्रुप बुकिंग देखील करता येणार आहे.
त्यामुळे जर तुम्ही तुमच्या कुटुंबासमवेत किंवा तुमच्या मित्रमंडळीसमवेत नवरात्र उत्सवाच्या काळात साडेतीन शक्तीपीठांच्या दर्शनाचा प्लॅन बनवत असाल तर पुणे विभागाचा हा निर्णय तुमच्यासाठी खूपच फायदेशीर ठरणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील स्वारगेट, शिवाजीनगर आणि पिंपरी-चिंचवड आगारातून या बसेस सोडल्या जाणार आहेत. वेळापत्रकाबाबत बोलायचं झालं तर पिंपरी-चिंचवड आगारातून ५ ऑक्टोबरला ही विशेष बस रवाना केली जाणार आहे.
ही बस सर्वप्रथम कोल्हापूरला जाणार आहे, मग तुळजापूरला पोहोचणार आहे. दुसर्या दिवशी तुळजापूरहून बस माहूरला पोहचणार आहे. पुढे तिसर्या दिवशी म्हणजेच 7 ऑक्टोबरला नाशिक, वणी येथे पोहचणार आहे.
आईसाहेब सप्तशृंगी मातेचे दर्शन झाल्यानंतर ही बस पिंपरी-चिंचवडला येणार आहे. या साडेतीन शक्तिपीठ दर्शनासाठी २ हजार ६८५ रुपये एवढे तिकीट काढावे लागणार आहे. पण, या प्रवासादरम्यान प्रवाशांना राहण्याचा, जेवण आणि दर्शन पासचा खर्च स्वतःला करावा लागणार आहे.