Maharashtra Rain : गेल्या दोन-तीन दिवसांपासून महाराष्ट्रातील हवामान अमुलाग्र बदल पाहायला मिळतोय. गेल्या तीन दिवसांपासून राज्यातील कोणत्याचं जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची नोंद करण्यात आलेली नाही. राज्याच्या काही भागात हलक्या पावसाने हजेरी लावली आहे. मात्र, जोरदार पाऊस गेल्या काही दिवसांपासून गायब आहे.
महत्त्वाचे म्हणजे आजही राज्यातील बहुतांश भागांमध्ये हवामान कोरडे राहणार असा अंदाज आयएमडीने दिला आहे. आज 15 सप्टेंबरला राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे.
परंतु उद्यापासून अर्थातच 16 सप्टेंबर पासून महाराष्ट्रात पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. 16 आणि 17 सप्टेंबरला राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये भारतीय हवामान खात्याने जोरदार ते अति जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.
हवामान खात्यातील तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे सोमवारपासून पावसाला सुरुवात होणार आहे. पण हा पाऊस विदर्भाकडून सुरू होईल. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये उद्या पावसाची शक्यता आहे.
मंगळवारी देखील विदर्भात जोरदार पाऊस बरसणार असा अंदाज आयएमडीने दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार उद्या अर्थातच सोमवारी विदर्भ विभागातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तसेच 17 सप्टेंबरला विदर्भातील सर्वच्या सर्व 11 जिल्ह्यांमध्ये म्हणजेच नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, वर्धा, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अकोला या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे. उर्वरित महाराष्ट्रात मात्र पावसाची प्रामुख्याने उघडीप राहणार असे म्हटले जात आहे.
मान्सून कधी निरोप घेणार ?
हवामान खात्यातील काही तज्ञांनी यंदा मान्सूनचा परतीचा प्रवास लांबणार असे मत व्यक्त केले आहे. तर काही तज्ञांनी यावर्षीही मान्सूनचा प्रवास त्याच्या वेळेतच सुरू होणार आणि वेळेतच मान्सून माघारी परतणार असे म्हटले आहे.
तथापि यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. एक ऑक्टोबर नंतरच मान्सूनच्या परतीच्या प्रवासा संदर्भात योग्य ती माहिती समोर येऊ शकणार आहे.