Goat Rearing : भारतात शेतीसोबतच फार पूर्वीपासून शेळीपालन हा व्यवसाय केला जात आहे. शेतीशी निगडित व्यवसाय असल्याने शेळीपालन व्यवसायातून शेतकऱ्यांना चांगली कमाई देखील होत आहे. शेळीपालन हा व्यवसाय कमी खर्चात सुरू होत असल्याने अलीकडे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात हा व्यवसाय केला जाऊ लागला आहे.
शेतकऱ्यांसोबतच ग्रामीण भागातील शेतमजूर देखील मोठ्या प्रमाणात शेळीपालन व्यवसाय करू लागले आहेत. मात्र असे असले तरी या व्यवसायातून जर चांगली कमाई करायची असेल तर शेळीच्या सुधारित जातीचे संगोपन करणे आवश्यक आहे.
दरम्यान आज आपण शेळीच्या अशाच एका सुधारित जातीची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज आपण सोनपरी या जातीच्या शेळीची माहिती पाहणार आहोत.
सोनपरी जातीच्या विशेषता
शेळीपालन हा व्यवसाय फार पूर्वीपासून केला जात आहे. शेळीपालन हा व्यवसाय दूध, मांस, लोकर, चामडे अशा उत्पादनासाठी केला जात आहे.
शेळीपालनातून चांगले उत्पन्न मिळत असल्याने अलीकडे अनेकांचा या व्यवसायाकडे कल वाढला आहे. अनेकजण शेळीपालन व्यवसाय करू पाहत आहेत.
मात्र कोणत्या शेळीच्या जातीचे संगोपन केले पाहिजे असा सवाल अनेकांना पडला आहे. जर तुमचाही असाच प्रश्न असेल तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की, तुमच्यासाठी शेळीची सोनपरी ही जात फायदेशीर ठरणार आहे.
लवकरात लवकर जर तुम्हाला शेळी पालन व्यवसायातून लाखो रुपयांची कमाई करायची असेल तर शेळीची सोनपरी ही जात तुमच्यासाठी अधिक फायद्याची राहणार आहे.
या जातीच्या शेळीला बाजारात मोठी मागणी असून याची विक्री चढ्या भावात केली जात आहे. शेळीची ही जात मांस उत्पादनासाठी विशेष फायद्याची ठरते.
या जातीचे शेळीचे मांस अधिक चविष्ट असल्याने बाजारात या जातीच्या शेळीच्या मांसाला मोठी मागणी आली आहे.
या जातीची प्रौढ शेळी सरासरी 30 किलोची बनते. यामुळे दहा ते वीस शेळीचे पालन करूनही शेतकऱ्यांना चांगली कमाई होऊ शकते.