7/12 Utara Download : तुम्ही शेतकरी असाल किंवा शेतकरी कुटुंबातून येत असाल तर तुमच्यासाठी आजच हा लेख कामाचा ठरणार आहे. आज आपण घरबसल्या सातबारा उतारा कसा मिळवायचा या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरंतर आता सर्वच प्रकारचे शासकीय कागदपत्रे नागरिकांना ऑनलाइन घरबसल्या उपलब्ध होत आहेत.
पूर्वी कोणतेही कागदपत्र काढायचे असले तर शासकीय कार्यालयांमध्ये हेलपाटे मारावे लागत असत. आता मात्र माहिती तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे सर्व प्रकारचे कागदपत्रे नागरिकांना घरबसल्या मिळू लागले आहेत. यासाठी फक्त एक अर्ज करावा लागतो.
ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर नागरिकांना सर्व प्रकारचे कागदपत्रे उपलब्ध होत आहेत. आता कोणतेही प्रकारचे कागदपत्र काढायचे असले तरी देखील पूर्वीसारखे लांब रागेत उभे राहावे लागत नाही. विशेष म्हणजे आता महाराष्ट्रातील जमीन मालकीची कागदपत्रे देखील भूमी अभिलेख विभागाच्या माध्यमातून ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
या ऑनलाइन सुविधेमुळे जमीन खरेदी विक्री प्रकरणात मोठी पारदर्शकता आली आहे. जमीन खरेदी करताना आधी मोठ्या प्रमाणात फसवणूक होण्याची भीती होती. मात्र भूमी अभिलेख विभागाच्या या सुविधेमुळे ही फसवणूक बऱ्याच प्रमाणात कमी झाली आहे.
महाभुमी अभिलेख यांच्या अधिकृत संकेतस्थळावर आता जमिनीशी संबंधित सर्व प्रकारचे कागदपत्रे जसे की सातबारा उतारा, 8अ उतारा अशी सर्व प्रकारचे कागदपत्रे ऑनलाईन मिळू लागली आहेत. यासाठी कोणत्याच शासकीय कार्यालयात जावे लागत नाही. फक्त घरबसल्या एक अर्ज करावा लागतो. खरे तर सातबारा उतारा हा सर्वच कामांसाठी उपयोगी ठरतो.
जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारासाठी तर सातबारा उतारा लागतोच शिवाय कर्ज काढायचे असेल, एखाद्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल किंवा अन्य काही शासकीय काम असेल तर हा उतारा आवश्यक असतो. यामुळे आज आपण घरबसल्या सातबारा उतारा कसा काढायचा, यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा या संदर्भात अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
सातबारा उतारा साठी घरबसल्या अर्ज कसा करायचा?
शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या जमिनीचा सातबारा उतारा काढायचा असेल तर यासाठी आता तुम्हाला पूर्वीप्रमाणे सेतू कार्यालयात हेलपाटे मारावे लागणार नाहीत. तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलवरूनच सातबारा उतारा डाऊनलोड करू शकता. यासाठी https://bhulekh.mahabhumi.gov.in/ या महाभुमिअभिलेख विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी लागणार आहे.
या वेबसाईटवर जर तुम्ही पहिल्यांदाच भेट दिली असेल तर तुम्हाला नवीन वापरकर्ता म्हणून नोंदणी करावी लागणार आहे. यासाठी जिल्हा, तालुका गाव अशी माहिती भरावी लागणार आहे. यानंतर तुम्हाला तुमच्या जमिनीची माहिती द्यावी लागणार आहे जसे की सर्वेक्षण क्रमांक, गट क्रमांक किंवा हिस्सा क्रमांक अशी माहिती तुम्हाला येथे भरायची आहे.
यानंतर तुम्हाला तुम्ही भरलेली सर्व माहिती काळजीपूर्वक चेक करायची आहे. माहिती काळजीपूर्वक चेक झाल्यानंतर तुम्ही हा अर्ज सबमिट करू शकणार आहात. यासाठी तुम्हाला काही शुल्क भरावे लागणार आहे. शुल्क भरल्यानंतर तुमचा अर्ज व्यवस्थित रित्या सबमिट होणार आहे.
यानंतर तुम्ही तुमच्या जमिनीचा डिजिटल सातबारा उतारा स्क्रीनवर पाहू शकता आणि हा सातबारा उतारा तुम्हाला डाऊनलोड करता येणार आहे. विशेष बाब अशी की ऑनलाईन काढला जाणारा हा सातबारा उतारा सर्वच प्रकारच्या शासकीय कामांसाठी चालतो. यामुळे सातबारा उतारा काढण्यासाठी तलाठ्याकडे जाण्याची गरज राहणार नाही.