50 Hajar Protsahan Anudan : भारत हा एक कृषीप्रधान देश आहे. देशातील निम्म्याहून अधिक जनसंख्या ही शेतीवर प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या अवलंबून आहे. या परिस्थितीत केंद्रशासन आणि राज्य शासन यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना कार्यान्वित केल्या जातात. गेल्या महाविकास आघाडी सरकारने देखील राज्यातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबवली होती.
या योजनेअंतर्गत तत्कालीन शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित महाविकास आघाडी सरकारने राज्यभरातील शेतकऱ्यांची दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी केली होती. एवढेच नाही तर या योजनेचा विस्तार करत गेल्या सरकारने नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला होता.
हा निर्णय मात्र गत महाविकास आघाडी सरकारला आपल्या कार्यकाळात प्रत्यक्ष लागू करता आला नाही. निर्णयाची अंमलबजावणी करण्यापूर्वीच महाविकास आघाडी सरकार कोसळले. परंतु वर्तमान शिंदे फडणवीस सरकारने गत सरकारचा हा निर्णय अबाधित राखत याची आता अंमलबजावणी सुरू केली आहे. दिवाळीच्या पूर्वसंध्येपासून या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली असून आत्तापर्यंत तीन याद्या या योजनेअंतर्गत जाहीर झाल्या आहेत.
दरम्यान आता या योजनेची चौथी यादी देखील महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत सरकारच्या अधिकारीक वेबसाईटवर प्रकाशित झाली आहे. निश्चितच यामुळे राज्यातील पात्र असूनही 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदानापासून आतापर्यंत वंचित असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
हे पण वाचा :- ब्रेकिंग ! राज्यातील सर्व महिलांना अर्ध्या तिकिटावर एसटीचा प्रवासाची योजना; ‘या’ महिन्यापासून होणार लागू, पहा डिटेल्स
50 हजार प्रोत्साहन अनुदानाचे स्वरूप
या प्रोत्साहन अनुदाना अंतर्गत 2017 18, 2018 19, 2019 20 या तीन वर्षांपैकी किमान दोन वर्ष नियमित पीक कर्जाची परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना 50 हजारापर्यंतचे प्रोत्साहन अनुदान राज्य शासनाच्या माध्यमातून दिल जाणार आहे. या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत तीन याद्या जाहीर झाल्या असून ज्या शेतकरी बांधवांची यादी मध्ये नावे आली आहेत अशा शेतकऱ्यांना आधार प्रामाणिकरण केल्यानंतर अनुदानाची रक्कम दिली जात आहे.
चौथ्या यादीत नाव कसे चेक करायचं
वास्तविक, या अनुदानाच्या याद्या चेक करण्यासाठी शेतकरी बांधवांना आपल्या जवळील आपले सेवा केंद्र किंवा सीएससीसेंटर वरच भेट द्यावी लागणार आहे. शेतकरी बांधवांना या याद्या पाहता येणार नाहीत, या याद्या पाहण्यासाठी सीएससी सेंटर चालकला आपली लॉगिन आयडी आणि पासवर्ड वापरून लॉगिन करत ही यादी डाउनलोड करावी लागते. यामुळे नियमित पीक कर्जाची परतफेड केलेल्या शेतकऱ्यांनी चौथ्या यादीमध्ये आपले नाव पाहण्यासाठी जवळील सीएससी सेंटरवर जायचे आहे.
यादीमध्ये नाव असल्यास लवकरात लवकर आधार प्रामाणिकरण करायचे आहे कारण की 31 मार्चपर्यंत या योजनेअंतर्गत अनुदानाची रक्कम संबंधितांना देऊ केली जाणार आहे. असं सांगितलं जात आहे की, या योजनेअंतर्गत चार याद्या प्रकाशित होणार आहेत. यामुळे ही अंतिम यादी समजली जात आहे.
परंतु शासनाकडून याबाबत अधिकारीक माहिती मिळालेली नाही. यामुळे आणखी याद्या येऊ शकतात का? की ही अंतिम यादी आहे हे जाणून घेण्यासाठी आणखी काही दिवस वाट पहावी लागणार आहे. तूर्तास या योजनेची चौथी यादी जाहीर झाली असून काही जिल्ह्याच्या तीनच याद्या जाहीर झालेल्या राहणार आहेत.
हे पण वाचा :- आता टाटा तयार करणार वंदे भारत ट्रेन ! येत्या 2 वर्षात धावणार तब्बल 200 वंदे भारत एक्सप्रेस, पहा रेल्वेच नियोजन