50 Hajar Protsahan Anudan : शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची अशी बातमी समोर येत आहे. प्रोत्साहनपर अनुदानाबाबत ही एक गुड न्यूज आहे. जस की आपणांस ठाऊक आहे गेल्या महाविकास आघाडी सरकारने आपल्या कार्यकाळात शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती. दोन लाखांपर्यंतची ही कर्जमाफी होती.
महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत देण्यात आलेल्या या कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून गत महाविकास आघाडी सरकारने नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. 50000 पर्यंतचे प्रोत्साहन अनुदान शेतकऱ्यांना देण्याची ही योजना होती.
गेल्या सरकारने घेतलेला हा निर्णय निश्चितच कौतुकास्पद होता आणि सर्व पक्षांनी याच स्वागत केलं होतं. मात्र, मध्यंतरी कोरोना आणि नंतर सत्तांतर यामुळे गेल्या सरकारला आपल्या कार्यकाळात हा निर्णय प्रत्यक्षात लागू करता आला नाही. दरम्यान आता नव्याने सत्तेत आलेल्या शिंदे फडणवीस सरकारने या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली आहे.
या पार्श्वभूमीवर आतापर्यंत या प्रोत्साहन पर अनुदानासाठी पात्र शेतकऱ्यांच्या दोन याद्या जारी झाल्या आहेत. आता या योजने संदर्भात एक मोठी माहिती हाती आली आहे. वास्तविक पाहता, पहिल्या आणि दुसऱ्या यादीत ज्या शेतकऱ्यांची नावे आली त्यांना आधार प्रमाणीकरण करणे बंधनकारक करण्यात आले. या पार्श्वभूमीवर संबंधित शेतकऱ्यांनी आधार प्रामाणिकरण केलं.
मात्र अजून या शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम मिळालेली नाही. दरम्यान आता यासाठी शासनाने एक नवीन सुविधा सुरू केली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या अनुदान वितरणासाठी शासनाने एक नवीन पोर्टल विकसित केला आहे. महाआयटीमाध्यमातून हे पोर्टल विकसित झाल आहे.
आता या नवीन पोर्टलच्या माध्यमातून लवकरात लवकर पात्र शेतकऱ्यांना रक्कम मिळण्यास मदत होणार आहे. आता सर्वात मोठा प्रश्न असा की या योजनेअंतर्गत पहिल्या आणि दुसऱ्या यादीतील पात्र शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम केव्हा मिळेल. हे जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
बातमी कामाची ! शिंदे-फडणवीस सरकारच ठरलं ; ‘या’ दिवशी मिळणार 50 हजार, पहा…..