50 Hajar Protsahan Anudan : नियमित पीक कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणे हेतू गेल्या महाविकास आघाडी सरकारने अनुदान देण्याची घोषणा केली होती. तत्सम निर्णय देखील झाला होता.
मात्र तत्कालीन शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या या निर्णयानंतर संपूर्ण जगात कोरोना नामक संकट आलं. यामुळे महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीवर ताण पडला. यामुळे हा मुद्दा लांबणीवर पडला. मध्यंतरी राज्यात सत्ता बदल झाला.
आघाडी सरकार कोसळले, अन राज्यात भाजपा आणि एकनाथ शिंदे गट यांनी मिळून सरकार स्थापन केले. या नवोदित सरकारने देखील गेल्या सरकारचा प्रोत्साहन अनुदानाचा निर्णय कायम ठेवला. या अनुदानाचे आता प्रत्यक्ष वाटप सुरू आहे.
पहिला टप्पा या अनुदानाचा पूर्ण झाला आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात प्रोत्साहन अनुदानाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. फडणवीस यांच्या मते आत्तापर्यंत महाराष्ट्रातील जवळपास साडेसहा लाख नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ देण्यात आला आहे.
आता उर्वरित तीन लाख शेतकरी बांधवांना 50000 प्रोत्साहन पर अनुदानाचा लाभ जानेवारी महिने अखेरपर्यंत मिळेल अशी माहिती त्यांनी दिली आहे. एवढेच नाही तर जोपर्यंत शेतकऱ्यांकडून कागदपत्राची पूर्तता होत नाही तोपर्यंत ही योजना सुरू राहणार आहे. म्हणजेच या योजनेसाठी जे पात्र शेतकरी आहेत त्या सर्व पात्र शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की सध्या नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे. याच अधिवेशनात बुधवारी विधानसभेत भाजपचे आमदार नारायण कुचवे यांनी जालना जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी लक्षवेधी सूचना मांडली होती. या सूचनेमध्ये अनेक सदस्यांनी उपप्रश्न उपस्थित केले.
त्यावेळी या उपप्रश्नांच्या उत्तरात देवेंद्र फडणवीस यांनी 50000 प्रोत्साहन अनुदानाबाबत ही माहिती सार्वजनिक केली. निश्चितच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जानेवारी महिन्यापर्यंत सर्व पात्र शेतकऱ्यांना अनुदान मिळेल अशी विधानसभेत माहिती दिली असल्याने पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदानासाठी प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील लाखों शेतकऱ्यांना याचा दिलासा मिळणार आहे.