16th Vande Bharat Express News : सध्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशात वंदे भारत एक्सप्रेस या संपूर्ण भारतीय बनावटीच्या रेल्वे गाडीची मोठी चर्चा रंगली आहे. 2019 मध्ये सर्वप्रथम सुरू करण्यात आलेली ही ट्रेन अल्पावधीतच रेल्वे प्रवाशांच्या मनात घर करून गेली आहे. हेच कारण आहे की भारतीय रेल्वे प्रवाशांच्या माध्यमातून देशातील वेगवेगळ्या रूटवर ही गाडी सुरू करण्यासाठी शासनाकडे वारंवार मागणी केली जात आहे.
प्रवाशांची ही मागणी पाहता भारतीय रेल्वेच्या माध्यमातून देखील देशातील काही प्रमुख मार्गावर ही गाडी सुरू करण्यासाठी कंबर कसण्यात आली आहे. विशेष म्हणजे पुढल्या वर्षी देशातील काही राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. तसेच लोकसभा निवडणुका देखील पुढल्या वर्षी राहणार आहेत.
हे पण वाचा :- मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसचा वेग किती? समोर आली धक्कादायक माहिती, पहा….
या सर्व पार्श्वभूमीवर केंद्रशासन देखील भारतीय रेल्वेला वेगवेगळ्या मार्गावर ही स्पेशल गाडी सुरू करण्यासाठी आदेशित करीत आहे. अशातच, एका मीडिया रिपोर्टमध्ये 15 ऑगस्ट 2023 पर्यंत भारतीय रेल्वे देशातील एकूण 75 महत्त्वाच्या मार्गावर ही गाडी सुरू करणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. दरम्यान 25 एप्रिल 2023 रोजी देशातील पंधरावी वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे.
केरळमध्ये ही एक्सप्रेस सुरू होणार असून त्रिवेंद्रम ते कासारगोड यादरम्यान ही गाडी धावणार आहे. या गाडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवणार आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेच्या माध्यमातून आवश्यक सर्व पूर्व प्रक्रिया पार पाडण्यात आली आहे. अशातच आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे ती 16 व्या वंदे भारत एक्सप्रेस बाबत.
हे पण वाचा :- मुंबईची चांदी होणार ! आणखी 3 वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार; रूटची माहिती वाचा इथं
मिळालेल्या माहितीनुसार, देशाला लवकरच सोळावी वंदे भारत एक्सप्रेस मिळणार असून ही गाडी झारखंड आणि बिहार या दोन महत्त्वाच्या राज्यांना कनेक्ट करणार आहे. ही गाडी झारखंडची राजधानी रांची आणि बिहारची राजधानी पटना या दोन कॅपिटल शहरांना जोडण्याचे काम करणार आहे.
रांची ते पटनादरम्यान सुरू होणारी ही गाडी मे महिन्यातील पहिल्या आठवड्यात सुरू होणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती एका मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे. विशेष म्हणजे यादेखील गाडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवणार आहेत. एकंदरीत मे महिन्यात देखील एप्रिल महिन्याप्रमाणेच देशातील काही महत्त्वाच्या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरु होणार असा आशावाद या निमित्ताने व्यक्त होत आहे.
हे पण वाचा :- मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस आता ‘या’ शहरापर्यंत धावणार ! रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची मान्यता मिळाली