15th Vande Bharat Express of India : आज देशाला 15वी वंदे भारत एक्सप्रेस मिळणार आहे. सध्या देशात 14 वंदे भारत एक्सप्रेस सुरू असून आज आणखी एक गाडी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कार्यान्वित करण्याची योजना आहे. या पार्श्वभूमीवर सर्व आवश्यक पूर्वतयारी झाली असून आज या गाडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे.
ही गाडी केरळमधील त्रिवेंद्रम ते कासारगोड दरम्यान धावणार आहे. केरळची ही पहिलीच वंदे भारत राहणार असून या गाडीमुळे त्रिवेंद्रम ते कासारगोड चा प्रवास जलद होणार आहे. तिरुवनंतपुरम येथील रेल्वे स्थानकावर आज या गाडीला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे.
यासाठी आवश्यक तयारी झाली असून हा सोहळा खास बनवण्यासाठी भारतीय रेल्वेने विशेष तयारी केली आहे. खरं पाहता, 180 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावण्यास सक्षम असलेल्या वंदे भारत ट्रेनला या मार्गावर सुरू करण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून जोर धरत होती.
अखेर कार या मागणीवर भारतीय रेल्वेच्या माध्यमातून सकारात्मक निर्णय घेतला गेला असून आज या मार्गावर ही गाडी सुरू होणार आहे. जरी या ट्रेनला आज हिरवा झेंडा दाखवला जाणार असला तरी देखील ही ट्रेन उद्यापासून प्रवाशांच्या सेवेत नियमित धावणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
हे पण वाचा :- वंदे भारत एक्सप्रेस; महाराष्ट्रात तब्बल 120 वंदे भारत ट्रेन तयार होणार, पहा भारतीय रेल्वेचा संपूर्ण प्लॅन
कस राहणार या गाडीचे वेळापत्रक?
ही गाडी केरळ मधील तिरुअनंतपुरम आणि कासारगोड या दोन शहरांसाठी अति महत्त्वाची राहणार आहे. यामुळे या दोन्ही शहरांदरम्यानचा प्रवास जलद आणि आरामदायी होणार आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तिरुअनंतपुरम येथील रेल्वे स्थानकावरून ही वंदे भारत ट्रेन रोज सकाळी 5.20 वाजता रवाना होणार आहे. यांनतर दुपारी 1 वाजून 25 मिनिटांनी ही ट्रेन कासारगोड रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.
म्हणजे जवळपास सात तासात ही गाडी आपला प्रवास पूर्ण करणार आहे. या ट्रेनच्या परतीच्या प्रवासाबाबत बोलायचं झालं तर ही ट्रेन कासारगोड येथून दुपारी 2 वाजून 20 मिनिटांनी तिरुअनंतपुरम कडे रवाना होणार आहे आणि संध्याकाळी 10.35 वाजता तिरुअनंतपुरमला पोहचणार आहे. एकंदरीत या ट्रेनमुळे प्रवाशांना जलद प्रवास करता येणार आहे. यामुळे प्रवाशांच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.
हे पण वाचा :- मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस बाबत मोठी अपडेट ! ही Vande Bharat ट्रेन….
कुठे राहणार थांबा?
रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या गाडीला तिरुअनंतपुरम, कोल्लम, कोट्टायम, एर्नाकुलम टाउन, थ्रिसूर, तिरूर, पलक्कड, पठानमथिट्टा, मलप्पुरम, कोझिकोड, कन्नूर आणि कासारगोड या रेल्वे स्थानकावर थांबा दिला जाणार आहे. निश्चितच या रेल्वेस्थानकावरील प्रवाशांना देखील या ट्रेनचा फायदा होणार आहे.
हे पण वाचा :- वंदे भारत एक्सप्रेस बाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची मोठी माहिती; म्हटले की, ऑगस्टमध्ये महाराष्ट्रात…..