14th Vande Bharat Train News : काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून दोन नवीन वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आल्या. म्हणजेच आता देशात एकूण तेरा वंदे भारत एक्सप्रेस कार्यान्वित झाल्या आहेत. विशेष बाब म्हणजे देशात एप्रिल महिन्यात आतापर्यंत तीन वंदे भारत गाड्या सुरु झाल्या आहेत. आता आणखी एक वंदे भारत ट्रेन या महिन्यात सुरु होणार आहे.
आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, 1 एप्रिल 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करकमलाद्वारे भोपाळ ते नवी दिल्ली दरम्यान वंदे भारत गाडी सुरू करण्यात आली. यानंतर काल म्हणजेच आठ एप्रिल 2023 रोजी सिकंदराबाद ते तिरुपती आणि चेन्नई ते कोइंबतूर यादरम्यान देखील ही गाडी सुरू करण्यात आली आहे.
हे पण वाचा :- अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगरसह 21 जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार ! आयएमडीचा अलर्ट
वास्तविक ही ट्रेन आपल्या आरामदायी आणि जलद प्रवासासाठी प्रवाशांमध्ये कमी वेळेतच विशेष लोकप्रिय बनली आहे. या ट्रेनची रेल्वे प्रवाशांना भुरळ पडली आहे. प्रत्येकाला ही ट्रेन हवीहवीशी वाटत आहे. हेच कारण आहे की, ही गाडी देशातील सर्वच प्रमुख मार्गावर सुरू करण्याचा मानस शासनाचा आहे. दरम्यान आता चौदाव्या वंदे भारत एक्सप्रेस बाबत एक मोठी माहिती हाती आली आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार देशात चौदावी बंदी भारत एक्सप्रेस 12 एप्रिल 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करकमलाद्वारे सुरू केली जाणार आहे. ही चौदावी गाडी दिल्ली-जयपूर-अजमेर या मार्गावर सुरू होणार आहे. या गाडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. या ट्रेनच्या उद्घाटनप्रसंगी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि इतर अनेक खासदार आणि आमदार जयपूरमध्ये उपस्थित राहणार असल्याची माहिती एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मध्ये देण्यात आली आहे.
हे पण वाचा :- पुणे, अमरावतीकरांसाठी खुशखबर ! प्रवाशांच्या सेवेसाठी मध्य रेल्वेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय, पहा…..
एका मीडिया रिपोर्ट मधून समोर आलेल्या माहितीनुसार, वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनच्या संचालनाची सर्व तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. या गाडीची चाचणी देखील नुकतीच पूर्ण करण्यात आली आहे. म्हणजेच या गाडीच्या उद्घाटनाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. त्याचवेळी चाचणीचा अहवालही उत्तर पश्चिम रेल्वेने रेल्वे बोर्डाला पाठवण्यात आला आहे.
उत्तर पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. शशी किरण यांनी याबाबत माहिती दिली आहे. एकंदरीत 12 एप्रिल 2023 रोजी देशाला 14 वी वंदे भारत ट्रेन मिळणार असून आगामी वर्षात लोकसभा निवडणुका होणार असल्याने देशातील इतरही प्रमुख मार्गावर ही ट्रेन सुरू केली जाणार असल्याची माहिती दिली जात आहे.
हे पण वाचा :- पांढर सोन चमकल ! कापूस दरात वाढ; कापूस 10 हजाराचा टप्पा गाठणार का? दरवाढ होणार का? पहा काय म्हणताय तज्ञ