14th Vande Bharat Train : देशात सध्या वंदे भारत एक्सप्रेसची चांगलीच क्रेज पाहायला मिळत आहे. देशातील वेगवेगळ्या आणि प्रमुख मार्गावर ही ट्रेन सुरु करण्याचा सिलसिला कायम आहे. या चालू महिन्यात देशात एकूण तीन वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्या असून आज आणखी एक ट्रेन देशातील दोन प्रमुख शहरांदरम्यान सुरू होणार आहेत.
आज दिल्ली ते अजमेर दरम्यान वंदे भारत ट्रेन सुरू होणार असून याला पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवणार आहेत. व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून हा सोहळा पार पाडला जाणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, देशात आतापर्यंत तेरा वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आला आहेत. यामध्ये या चालू महिन्यात भोपाळ ते नवी दिल्ली, तिरुपती ते सिकंदराबाद आणि चेन्नई ते कोयंबटूर या तीन गाड्यांचा समावेश आहे. दरम्यान, आज या चालू महिन्यात 4थी वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे. ही राजस्थानमधील पहिलीच वंदे भारत एजस्प्रेस राहणार आहे.
रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज या गाडीचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मोदी या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. तसेच, या सोहळ्याला केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव हे जयपूरमध्ये उपस्थित राहणार आहेत. या ट्रेनचे आज उदघाट्न होणार असले तरी देखील ही गाडी उद्यापासून रेगुलर धावेल अशी माहिती देण्यात आली आहे.
निश्चितच, या ट्रेनमुळे आता राजस्थानचे अजमेर, जयपूर ते दिल्ली हा प्रवास अधिक गतिमान होणार आहे. अशातच आता केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री यांनी मुंबई ते गोवा या दरम्यान वंदे भारत ट्रेन सुरु होणार असल्याचे सांगितले आहे. यामुळे ही ट्रेन केव्हा सुरु होते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.