12th Vande Bharat Train Will Run : फेब्रुवारी महिन्यात देशात दोन वंदे फार ट्रेन सुरू करण्यात आल्या. यानंतर एप्रिल महिन्याच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अकरावी वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात आली. ही ट्रेन भोपाल ते नवी दिल्ली दरम्यान सुरु झाली आहे. दरम्यान आता देशाला बारावी वंदे भारत एक्सप्रेसची भेट केंद्र शासनाच्या माध्यमातून दिली जाणार आहे.
ही बारावी गाडी सिकंदराबाद ते तिरुपती दरम्यान सुरु होणार असून उद्या म्हणजेच आठ एप्रिल रोजी या गाडीला पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. सेमी-हायस्पीड सिकंदराबाद-तिरुपती वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या सिकंदराबाद रेल्वे स्थानकावर करण्याचे नियोजन आखण्यात आले आहे.
सिकंदराबाद-तिरुपती वंदे भारत एक्सप्रेस, IT सिटी, हैदराबादला भगवान व्यंकटेश्वराच्या निवासस्थानाशी, तिरुपतीला जोडणारी राहणार आहे. विशेष बाब अशी की, तेलंगणामधून सुरू होणारी दुसरी वंदे भारत ट्रेन आहे. या ट्रेन मुळे दोन शहरांमधील प्रवासाचा वेळ कमी होणार असून प्रवास जलद आणि आरामदायी होणार आहे. जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार ही गाडी 8 तास 30 मिनिटांत 660 किलोमीटरचे अंतर कापण्यास सक्षम राहणार आहे.
निश्चितच या ट्रेनमुळे या दोन्ही शहरांदरम्यान कनेक्टिव्हिटी सुधारण्यास मदत होणार आहे. तिरुपती हे देशातील एक महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे. या ठिकाणी देशभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. सिकंदराबाद येथूनही रोजाना हजारो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात यामुळे या ट्रेनचा या भाविकांना मोठा फायदा होणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार मंगळवार सोडून ही गाडी आठवड्याचे सर्व दिवस सुरु राहणार आहे.
हे पण वाचा :- मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसला आता ‘या’ ठिकाणी मिळणार थांबा; केंद्रीय मंत्र्यांची माहिती
एका प्रतिष्ठित मेडिया रिपोर्ट मध्ये दिलेल्या माहितीनुसार ही ट्रेन नलगोंडा, गुंटूर, ओंगोल आणि नेल्लोर या ठिकाणी थांबणार आहे. अद्याप या ट्रेनला नेमके कुठे थांबे दिले जातील याबाबत अधिकारी माहिती हाती आलेली नाही मात्र काही मीडिया रिपोर्ट मध्ये या चार ठिकाणी ही ट्रेन थांबेल असा दावा केला जात आहे.
एकंदरीत देशाला उद्या बारावी वंदे भारत ट्रेन मिळणार असून येत्या काही महिन्यात आणखी वंदे भारत ट्रेन देशातील प्रमुख मार्गावर सुरू करण्याचा मानस सरकारचा आहे. या अनुषंगाने शासनाकडून आणि प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. आपल्या महाराष्ट्राला देखील लवकरच आणखी काही वंदे भारत ट्रेनची भेट मिळणार आहे. यामध्ये प्रामुख्याने मुंबई गोवा आणि पुणे सिकंदराबाद या रूट वर वंदे भारत ट्रेन सुरू केली जाणार आहे.
हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी; कोस्टल रोडच्या उद्घाटनाचा मुहूर्त बदलला, आता ‘या’ महिन्यात होणार उद्घाटन, पहा…..