12th Vande Bharat Train : भारतात सध्या वंदे भारत एक्सप्रेसची मोठी क्रेझ आहे. आरामदायी प्रवास आणि जलदगती यामुळे या गाडीचा हेवा रेल्वे प्रवाशांना वाटू लागला आहे. वास्तविक या ट्रेनचे भाडे इतर ट्रेनच्या तुलनेत अधिक आहे. तरी देखील रेल्वे प्रवाशांच्या माध्यमातून या गाडीला पसंती दिली जात आहे. हेच कारण आहे की, आता वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून त्यांच्या मतदारसंघात या वंदे भारत ट्रेनची मागणी होऊ लागली आहे.
आपल्या महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात या ट्रेनची मागणी आहे. वेगवेगळ्या रूटवर वंदे भारत ट्रेन सुरू करण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. सद्या स्थितीला राज्यात ही ट्रेन एकूण चार मार्गावर धावत आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राला लवकरच आणखी दोन वंदे भारत ट्रेनची भेट मिळणार आहे.
हे पण वाचा :- उन्हाळी कांद्याला येणार अच्छे दिन! मागणी वाढण्याची शक्यता, पहा काय म्हणताय तज्ञ
पुणे-सिकंदराबाद यादरम्यान असलेली शताब्दी एक्सप्रेस बंद करून त्या रूटवर वंदे भारत ट्रेन सुरू केली जाणार आहे. सोबतच मुंबई ते गोवा या दोन ग्लोबल पर्यटन स्थळादरम्यान देखील लवकरच वंदे भारत गाडी सुरू केली जाणार आहे. याबाबतची माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी नुकतीच दिली आहे. या दोन ट्रेन मात्र केव्हा सुरू होतील याबाबत अद्याप कोणतीच माहिती हाती आलेली नाही.
परंतु जयपूर ते दिल्ली दरम्यान धावणारी 11वी वंदे भारत ट्रेन एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुरू केली जाणार आहे. यासोबतच बाराव्या वंदे भारत गाडीची देखील घोषणा झाली आहे. ही बारावी वंदे भारत ट्रेन चेन्नई ते कोयंबटूर या दरम्यान धावणार आहे. एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मध्ये दिलेल्या माहितीनुसार, ही ट्रेन येत्या 8 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करकमलाद्वारे प्रवाशांच्या सेवेसाठी दाखल होऊ शकते.
विशेष म्हणजे चेन्नईला ही दुसरी वंदे भारत ट्रेन मिळणार आहे. सध्या स्थितीला सुरू असलेल्या चेन्नई ते कोयंबटूरदरम्यानच्या शताब्दी एक्सप्रेस ऐवजी या वंदे भारत गाडीला त्या रूट वर सुरू करण्याच नियोजन रेल्वेने आखले आहे. ही ट्रेन मात्र या रूटवर कोणकोणत्या ठिकाणी थांबणार याबाबत अद्याप माहिती हाती आलेले नाही.
परंतु शताब्दी एक्सप्रेस या रूटवर एकूण चार ठिकाणी थांबे घेते. त्यामुळे ही ट्रेन देखील त्याच ठिकाणी थांबे घेणार की थांब्यांची संख्या कमी केली जाणार याबाबत अद्याप माहिती हाती आलेली नाही. निश्चितच देशाला आता लवकरच बारावी वंदे भारत ट्रेन मिळणार असून यामुळे चेन्नई ते कोयंबटूर दरम्यानचा प्रवास आणखीनच सोयीचा होणार आहे.
हे पण वाचा :- महिलांना नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ जिल्ह्यात अंगणवाडी सेविकांची मेगा भरती सुरू, अर्ज करण्याची पद्धत पहा