11th Vande Bharat Train : भारतीय रेल्वेच्या माध्यमातून रेल्वे प्रवाशांना लवकरच एक मोठे गिफ्ट मिळणार आहे. भारतीय रेल्वेचा चेहरा मोहरा ज्या वंदे भारत ट्रेन मुळे बदलला आहे त्याबाबत एक मोठी माहिती हाती आली आहे. संपूर्ण भारतीय बनावटीची वंदे भारत ट्रेन अल्पावधीतच रेल्वे प्रवाशांच्या पसंतीस खरी उतरली आहे. हेच कारण आहे की भारतीय रेल्वेच्या माध्यमातून अधिकांधिक या ट्रेन सुरू केल्या जात आहेत.
देशातील वेगवेगळ्या मार्गावर या ट्रेन सुरू करण्याचा मानस शासनाने देखील बोलून दाखवला आहे. सध्या संपूर्ण देशभरात एकूण दहा वंदे भारत ट्रेन कार्यरत आहेत. यापैकी चार ट्रेन आपल्या महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रातील नागपूर-बिलासपुर, मुंबई-गांधीनगर, मुंबई-साईनगर शिर्डी आणि मुंबई सोलापूर या चार रूटवर वंदे भारत गाड्या धावत आहेत.
विशेष म्हणजे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबई ते गोवा या दोन शहरा दरम्यान ही गाडी लवकरच धावणार असल्याचे स्पष्ट केले आहे. सध्या मुंबई ते गोवा दरम्यान असलेल्या रेल्वे मार्गावर विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले असून या रूटची चाचणी पूर्ण झाल्यानंतर लगेचच या मार्गावर वंदे भारत ट्रेन सुरू होणार आहे.
हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी ! कोस्टल रोड प्रकल्प लांबण्याची शक्यता; ‘या’ वेळी पूर्ण होणार काम, वाचा सविस्तर
खरं पाहता महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबई तसेच देशातील जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून ख्यातीप्राप्त गोवा यादरम्यान लाखो प्रवासी प्रवास करत असतात. यामुळे या दोन्ही पर्यटन दृष्ट्या, व्यापारी दृष्ट्या महत्त्वाच्या शहरांना जोडण्यासाठी ही वंदे भारत एक्सप्रेस मोलाची भूमिका निभावणार आहे. यासोबतच रेल्वे बोर्ड कडून पुणे सिकंदराबाद या रूटवर देखील लवकरच वंदे भारत गाडी सुरू केली जाणार आहे.
या रूट वर असलेली शताब्दी एक्सप्रेस कोरोना काळापासून बंद असल्याने आता या रूटवर थेट वंदे भारत गाडी सुरू करण्याचा मानस बोर्डाचा आहे. याव्यतिरिक्त, भारतीय रेल्वे कडून जयपूर ते दिल्ली दरम्यान लवकरच वंदे भारत गाडी सुरू होणार आहे. फायनान्शियल एक्सप्रेस या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या रूटवर या चालू महिन्यातील तिसऱ्या आठवड्यात म्हणजेच 20 मार्चनंतर दिल्ली ते जयपूर दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू केली जाणार आहे. आतापर्यंत देशात दहा वंदे भारत ट्रेन सुरू असून ही 11वी वंदे भारत ट्रेन राहणार आहे.
हे पण वाचा :- नमो शेतकरी महासन्मान निधी योजना नेमकी काय आहे?, राज्यातील कोणत्या अन किती शेतकऱ्यांना मिळणार लाभ? वाचा सविस्तर
निश्चितच या ट्रेनचा प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि राजस्थानची राजधानी जयपूर या दोन्ही कॅपिटल सिटी औद्योगिक दृष्ट्या, शैक्षणिक दृष्ट्या अति महत्त्वाच्या तर आहेतच शिवाय हे दोन्ही शहरे पर्यटनात्मक दृष्ट्या देखील महत्त्वाची आहेत. यामुळे या रूटवर ही गाडी सुरू झाली तर जलद आणि आरामदायी प्रवास प्रवाशांना करता येणार आहे. या गाडीचा हजारो प्रवाशांना फायदा होणार आहे.
या गाडीबाबत अधिक माहिती अशी की, ही नवी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन आठवड्यातून सहा दिवस चालणार आहे. ट्रेनमध्ये ऑन बोर्ड केटरिंग सेवा देखील राहणार आहे. आपल्या एका निवेदनात रेल्वेने म्हटले आहे की, वंदे भारत ट्रेन जयपूर ते नवी दिल्ली दरम्यान मार्च 2023 च्या तिसऱ्या आठवड्यात (20 मार्च 2023 नंतर) सुरू होण्याची शक्यता आहे. वंदे भारत ट्रेनमध्ये ऑन बोर्ड केटरिंग सेवा देण्याची व्यवस्था करावी असा सल्ला देखील देण्यात आला आहे.
हे पण वाचा :- Vande Bharat Train : मोठी बातमी! ‘या’ दोन शहरा दरम्यान धावणारी वंदे भारत ट्रेन आता आठवड्यातील सहा दिवस धावणार