11th Vande Bharat Train Of India Inauguration : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला 11 व्या वंदे भारत एक्सप्रेसची भेट देणार आहेत. आत्तापर्यंत संपूर्ण देशात एकूण दहा वंदे भारत एक्सप्रेस सुरू असून आता अकरावी वंदे भारत एक्सप्रेस देखील आजपासून सुसाट धावणार आहे. ही अकरावी वंदे भारत एक्सप्रेस मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ ते दिल्ली दरम्यान धावणार आहे. विशेष बाब असे की मध्य प्रदेश ला ही पहिलीच वंदे भारतची भेट राहणार आहे.
मध्यप्रदेश मध्ये यावर्ष अखेर विधानसभा निवडणुकीचा बिगुल उगाच येणार आहे या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या माध्यमातून एमपी ला ही मोठी भेट देण्यात आली आहे. राणी कमलापती रेल्वे स्थानक ( भोपाळ ) ते नवी दिल्ली या रूट वर धावणारी ही अकरावी वंदे भारत गाडी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करकमलाद्वारे दुपारी सव्वा तीन वाजता सुरु करण्याचे नियोजन आहे.
निश्चितच या ट्रेनमुळे मध्य प्रदेश मधील रेल्वे वाहतुकीला चालना मिळणार आहे. येथील प्रवाशांना दिल्लीकडील प्रवास यामुळे सोयीचा होणार आहे. मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ आणि देशाची राजधानी दिल्ली यामुळे परस्परांना थेट कनेक्ट होतील आणि या दोन्ही शहरांदरम्यानचा प्रवास अधिक गतिमान होईल असा आशावाद या निमित्ताने व्यक्त होत आहे.
दरम्यान देशाला लवकरच आणखी काही वंदे भारत एक्सप्रेस ची भेट मिळण्याची शक्यता आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, या अकराव्या वंदे भारत एक्सप्रेस व्यतिरिक्त आणखी नवीन चार मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस गाडी सुरू केली जाणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण नेमक्या कोणत्या चार मार्गावर नवीन वंदे भारत एक्सप्रेस सुरू होतील याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत.
हे पण वाचा :- डोंबिवली, ठाणेकरांना मिळणार मोठी भेट ! ‘या’ महिन्यात सुरु होणार मोठा गाव-माणकोली खाडी पूल, उद्घाटनाची नवीन तारीख जाहीर, पहा…..
या मार्गावर सुरू होणार नवीन वंदे भारत एक्सप्रेस
बारावी वंदे भारत एक्सप्रेस गाडी ही चेन्नई ते कोईमतूर या मार्गावर सुरू होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार या ट्रेनचे आठ एप्रिल 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. दरम्यान ही दक्षिण भारतातील दुसरी आणि भारतातील 12 वी वंदे भारत ट्रेन राहणार आहे. याशिवाय 13 वी वंदे भारत ही राजस्थानची राजधानी जयपूर आणि दिल्ली दरम्यान सुरू केली जाणार आहे.
या मार्गावर सध्या ट्रायल घेण्याचे काम सुरू असून लवकरच या रूटवर ही ट्रेन सुरू केली जाणार आहे. त्यानंतर मग 14 वी वंदेभारत तिरूपती ते सिंकदराबाद चालविण्याची योजना भारतीय रेल्वेच्या माध्यमातून आखण्यात आली आहे. परंतु 15 व्या वंदे भारतबाबत अद्याप फारशी माहिती हाती आलेली नाही.
हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; नेरुळ-उरण रेल्वे मार्ग उद्घाटनाची तारीख हुकली, आता ‘या’ दिवशी सुरु होणार हा मार्ग