11th Vande Bharat Train News : देशात सध्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन वेगवेगळ्या मार्गावर सुरू करण्यासाठी भारतीय रेल्वेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. केंद्र शासन देखील आगामी वर्षात लोकसभा निवडणुका पाहता देशातील प्रमुख मार्गांवर ही संपूर्ण भारतीय बनावटीची आणि मेक इन इंडिया प्रोजेक्ट अंतर्गत तयार झालेली ट्रेन चालवण्यासाठी आपल्या स्तरावर प्रयत्न करत आहे.
दरम्यान देशाला लवकरच अकरावी वंदे भारत ट्रेन मिळणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, एक एप्रिल 2023 रोजी अर्थातच नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी भारताला अकरावी वंदे भारत गाडी मिळणार आहे.
हे पण वाचा :- मोदी सरकारची मोठी भेट! आता ‘या’ दोन शहरादरम्यान सुरु होणार वंदे भारत एक्सप्रेस; तारीखही झाली डिक्लेअर, पहा
आतापर्यंत काही मीडिया रिपोर्ट मध्ये सांगितलं जात होतं की दिल्ली ते जयपूर दरम्यान अकरावी वंदे भारत ट्रेन सुरू केली जाणार आहे. मात्र, आता DNA या इंग्रजी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, जयपूर ते दिल्ली वंदे भारत एक्सप्रेस सुरू न होता आता भोपाळ ते नवी दिल्ली या मार्गांवर ही गाडी सुरू होणार आहे. म्हणजेच जयपूर ते दिल्ली वंदे भारत एक्सप्रेसला आणखी काही काळ वाट पहावी लागणार आहे.
दरम्यान, राणी कमलापती रेल्वे स्टेशन भोपाळ ते नवी दिल्ली यादरम्यान धावणारी वंदे भारत एक्सप्रेस एक एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करकमळाद्वारे प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल अशी माहिती देण्यात आली आहे. ही ट्रेन आग्रा कॅंट स्टेशनमार्गे 709 किमीचे अंतर 7 तास 50 मिनिटांत पूर्ण करणार म्हणजे शताब्दी एक्स्प्रेसपेक्षा 1 तास आधीच ही ट्रेन आपला प्रवास पूर्ण करण्यास सक्षम राहणार आहे.
हे पण वाचा :- पुणे, सोलापूर वासियांसाठी महत्वाची बातमी; मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसच्या वेळेत बदल,…
साहजिकच प्रवाशांचा एक तासांचा कालावधी वाचणार असल्याने या ट्रेनचा या रूट वर रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा मोठा फायदा होणार आहे. भारतीय रेल्वेने या संदर्भात एक मोठी माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भोपाळ आणि नवी दिल्ली दरम्यान एक एप्रिल ला सुरू होणारी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन 16 डब्यांची ट्रेन राहणार आहे. ही ट्रेन पलवल – आग्रा सेक्शनवर जास्तीत जास्त 160 किमी ताशी, आग्रा – ललितपूर सेक्शन दरम्यान 130 किमी ताशी आणि उत्तर मध्य रेल्वे (NCR) झोनच्या ललितपूर – बीना सेक्शन दरम्यान 120 किमी ताशी वेगाने प्रवास करण्यास सक्षम राहणार आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की सध्या स्थितीला या मार्गावर सुरू असणारी शताब्दी एक्सप्रेस वर्षाचे 365 दिवस धावते. मात्र या रूटवर नवीन वंदे भारत एक्सप्रेस केवळ आठवड्याचे सहा दिवस सुरू राहणार असून शनिवारी ही ट्रेन धावणार नाही. निश्चितच 11व्या वंदे भारत ट्रेन बाबत भारतीय रेल्वेने निर्णय घेतला असून एक एप्रिल 2023 पासून या नविन ट्रेनचा प्रवाशांना फायदा होणार आहे.
हे पण वाचा :- नुसताच बोभाटा ! वंदे भारत एक्सप्रेस बाबत समोर आली ‘ही’ मोठी…