Maharashtra Vande Bharat Express Train : भारतीय रेल्वेत गेल्या काही दशकात मोठा बदल पाहायला मिळत आहे. रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आपल्या प्रवाशांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वे देखील वेगवेगळ्या सोयी सुविधा उपलब्ध करून देणे असे तत्पर दिसत आहे.
याचाच एक भाग म्हणून रेल्वे प्रवास जलद करण्यासाठी भारतीय रेल्वेने 2019 मध्ये वंदे भारत एक्सप्रेस सुरू केली. तेव्हापासून आत्तापर्यंत देशातील 16 महत्त्वाच्या मार्गावर ही गाडी सुरू झाली आहे. राज्यातही एकूण चार मार्गांवर एक्सप्रेस धावत आहे. यापैकी दोन मार्ग हे महाराष्ट्रातच आहेत. मुंबई सोलापूर आणि मुंबई शिर्डी हे दोन महाराष्ट्रातीलच म्हणजेच इंटरेस्टेट मार्गावर वंदे भारत धावत आहे.
मात्र अशातच वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात एक मोठी धक्कादायक बातमी समोर येत आहे. ही बातमी संपूर्ण मराठी भाषिक व्यक्तींसाठी धक्का देणारी आहे. खरं पाहता, वंदे भारत एक्सप्रेस मध्ये प्रवाशांसाठी वेगवेगळ्या सोयी सुविधा आहेत. या ट्रेनचा वेग तर जलद आहेच शिवाय प्रवाशांच्या सोयीसाठी आणि करमणुकीसाठी देखील वंदे भारत एक्सप्रेस मध्ये काही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
या ट्रेनमध्ये करमणुकीसाठी मोफत वायफाय उपलब्ध करून दिले जात असून याच्या माध्यमातून व्हिडिओ आणि ऑडिओ मनोरंजनाची साधन आहेत. पण यात हिंदी, तमिळ, तेलगू आणि इंग्रजी या चारच भाषांमध्ये व्हिडिओ आणि ऑडिओ सध्या उपलब्ध आहेत. म्हणजेच मराठी भाषेत ही साधने उपलब्ध नाहीत. वास्तविक, मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस मध्ये 90% हून अधिक मराठी भाषिक प्रवास करतात.
शिवाय मुंबई-शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस मध्ये देखील मराठी भाषीकांची संख्या सर्वाधिक आहे. साहजिकच, राज्यातच या ट्रेन धावत असल्याने यामध्ये मराठी भाषिकांची संख्या अधिक राहणारच आहे मात्र या ट्रेनमध्ये मराठीत व्हिडिओ आणि ऑडिओची साधने उपलब्ध नाहीत. यामुळे केंद्र शासनाच्या महत्त्वकांक्षी प्रकल्पांतर्गत तयार झालेल्या वंदे भारत एक्सप्रेस मध्ये मराठी भाषेला तिलांजली दिली जात असल्याचा आरोप आता प्रवाशांच्या माध्यमातून केला जात आहे.
दरम्यान रेल्वे प्रशासनाने मुंबई सोलापूर वंदे भारत ट्रेन चेन्नईच्या कोच फॅक्टरी मध्ये तयार झाली असल्याने त्या ठिकाणी तमिळ आणि तेलुगु या दोन भाषा समाविष्ट असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. शिवाय आता लवकरच महाराष्ट्रातील लातूर रेल्वे कोच फॅक्टरी मध्ये वंदे भारत एक्सप्रेसची निर्मिती होणार असून
लवकरच मराठी भाषेचा देखील पर्याय आपल्याला या ट्रेनमध्ये दिसेल असेही प्रशासनाच्या माध्यमातून नमूद केले जात आहे. शिवाय सोलापूर विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांनी देखील या प्रकरणात जातीने लक्ष घालून लवकरच रेल्वे मधील या तांत्रिक गोष्टीत सुधारणा होईल असं आश्वासन दिल आहे.