Home buying Tips : तरुणांनो घर घेताय ? आधी ही माहिती वाचाच

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बजेट संतुलित ठेवा :

कोणतीही मालमत्ता खरेदी करताना आपण किती पैसे उभे करू शकतो, हे पाहणे गरजेचे आहे. खरेदी करण्यापूर्वी किती रक्कम वापरणार आहात किंवा हितचिंतकाकडून किंवा बँकेकडून कर्ज घेणार का? या गोष्टींचा सारासार विचार करावा. आपण स्वतःच्या खिशातून खर्च करत असाल तर चिंतेची गोष्ट नाही. मात्र, कर्ज घेणार असाल तर आपला मासिक खर्च आणि काळानुसार वाढणारा खर्च याचा विचार करायला हवा. उदा. आपण अविवाहित असाल तर विवाहानंतर वाढणारे खर्च,पाल्यांचे खर्च, शिक्षण आदी गोष्टींचा विचार करून निर्णय घ्यायला हवा. आपला जोडीदार नोकरदार किंवा व्यवसायात असेल तर घराचे बजेट वाढवण्याचा निर्णय घेऊ शकतो. यानुसार आपल्या आर्थिक अडचणीच्या काव्यात जोडीदाराचे उत्पन्न महत्त्वाची भूमिका बजावते.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

स्थान आणि राहणीमानाचा खर्च :

आपण ज्या ठिकाणी घर घेणार आहात, तेथील राहणीमान आणि परिसराची पाहणी करणे गरजेचे आहे. नव्याने विकसित होणाऱ्या ठिकाणी कमी किमतीत घर मिळेल, या भ्रमात राहून घर खरेदी करणे महागडे राहू शकते. कारण तेथे घर स्वस्त मिळेल. मात्र, लिव्हिंग कॉस्ट अधिक राहील. लिव्हिंग कॉस्ट म्हणजे दैनंदिन खर्च. एकाच क्षेत्रात विकसित होणाऱ्या वेगवेगळ्या कॉलनीत राहणीमानावरचा खर्च हा वेगवेगळा राहू शकतो. यानुसार साफसफाई, सुरक्षा, घराची बांधणी, मोकळेपणा, पार्किंग, वनराई यांसारख्या सुविधांच्या आधारे लिव्हिंग कॉस्ट वाढते. तसेच ज्या ठिकाणी घरे महाग असतात, तेथील परिसरातही लिव्हिंग कॉस्ट अधिकच राहते.

गुन्हेगारीबहुल भागापासून दूर राहा :

प्रत्येक शहरातील ठरावीक भागात गुंड, टवाळखोर लोकांचे वास्तव्य असते. त्यामुळे जागा किंवा घर खरेदी करताना संबंधित भागातील गुन्हेगारी घटनांची माहिती घेणे गरजेचे आहे. दिल्ली एनसीआर भागाचा विचार केला तर त्यात गुन्ह्यांचे प्रमाण वेगवेगळे राहू शकते. याप्रमाणे अन्य शहरांतही असाच अनुभव येऊ शकतो. अशावेळी विकासकाशी चर्चा करताना या गोष्टींचा विचार करावा आणि स्वतःही माहिती काढण्याबाबत सजग राहावे. कॉलनी किंवा मोठ्या सोसायटीत राहणे सुरक्षित राहू शकते. मात्र, ये-जा करणारा मार्ग आणि रात्रीच्या वेळची स्थिती कितपत सुरक्षित आहे, हेदेखील जाणून घेतले पाहिजे.

रोजगार आणि भवितव्य :

कामकाजाचे ठिकाण जवळ असणारे तसेच कारखाने, कंपन्या जवळ असणाऱ्या भागांना अधिक मागणी असते. त्यामुळे अशा भागातील घरांना अधिक मागणी राहते. एवढेच नाही, तर घराजवळच काम मिळाले किंवा नोकरीचे ठिकाण असेल, तर प्रवासासाठी फारसा वेळ लागत नाही आणि बचतही होते. गेल्या दोन-तीन दशकांत नोएडा, गुडगावशिवाय पुणे, बंगळुरूसारख्या शहरातील घरांना मागणी वाढली आहे. त्यामुळे ज्या शहरात भागात घराची खरेदी करत असाल, त्या भागाचा भविष्यासाठी किंवा वर्तमान स्थितीत होणारा फायदा जाणून घेतला पाहिजे. मॉल, बगिचा, सिनेमा, मेट्रो, बसस्थानक आदी सार्वजनिक सेवेचे केंद्र होत असेल, तर अशा ठिकाणी घर खरेदी करणे हा फायद्याचा सौदा ठरू शकतो.

थ्री बीएचकेची वाढती मागणी :

गेल्या तीन वर्षांतील रिअल इस्टेट बाजाराचे आकलन केले तर महानगरांबरोबरच दुसऱ्या श्रेणीतील शहरात श्री बीएचके घरांची मागणी वाढलेली दिसून येते. प्रामुख्याने कोरोना काळानंतर नागरिकांत मोठे घर घेण्याची इच्छा वाढली आहे. दोन किंवा तीन बेडरुमबरोबरच सव्हेट रुम असणाऱ्या घरांना प्राधान्य दिले जात आहे. वर्क फ्रॉम होमचा वाढता ट्रेंड पाहता अशा घरांना मागणी वाढत आहे.

भविष्यातील गरजा :

सध्याच्या काळात आपण वन बीएचके किंवा वन आरके खरेदी करण्याची शक्यता असेल, तर भविष्यात आपली गरज वाढणार नाही, असे समजू नका. म्हणून घर खरेदी करताना भविष्यातील गरजांवर लक्ष द्यायला हवे. आपल्याकडे आईवडिल, जोडीदार आणि अपत्य असेल तर आणि वन बीएचके घेत असाल तर हा विचार थांबवा. टू बीएचके घेण्याचा विचार करावा. कारण आपला मुलगा किंवा मुलगी मोठी होईल तेव्हा घरात येणाऱ्या पाहुण्यांना थांबण्यासाठी जागाच राहणार नाही

पायाभूत सुविधा :

पायाभूत सुविधांची उपलब्धतादेखील घर खरेदीत महत्त्वाची आहे. रस्ते रुंद असणे, वाहतूक कोंडीच्या काळात पर्यायी रस्ता कोणता आहे, सांडपाणी व्यवस्थापन, वीजपुरवठा, शाळा, कॉलेज आदी सुविधांचे आकलन करणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. या सर्व गोष्टींची उपलब्धता असेल तर आगामी काळासाठी कोणतीही चिंता राहणार नाही. या गोष्टींचा विचार करत घर खरेदी केल्यास दीर्घकाळापर्यंत घर बदलण्याची गरज भासणार नाही आणि संबंधित भाग सोडून अन्य ठिकाणी जाण्याची आवश्यकता वाटणार नाही.