Maharashtra Onion Rate : केंद्रातील सरकारने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कांदा निर्यात सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. डिसेंबर 2023 मध्ये सरकारने कांदा निर्यात बंदी लागू केली होती. या निर्यात बंदीचा मात्र शेतकऱ्यांना मोठा फटका बसला.
कांद्याला अपेक्षित असा भाव मिळत नव्हता. यामुळे शेतकऱ्यांमध्ये शासनाविरोधात मोठी नाराजी पाहायला मिळाली. दरम्यान शेतकऱ्यांची ही नाराजी निवडणुकीच्या काळात सत्ताधाऱ्यांच्या अंगलट येण्याची शक्यता तज्ञांच्या माध्यमातून व्यक्त केली जात होती.
यामुळे तडकाफडकी सरकारने कांदा निर्यात सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र सरकारने कांदा निर्यातीसाठी निर्यात शुल्क लावले. यामुळे कांदा निर्यात सुरू झाली तरी देखील याचा शेतकऱ्यांना फायदा झालेला नाही.
ज्या दिवशी कांदा निर्यात बंदी मागे घेण्याचा निर्णय झाला त्याच दिवशी फक्त कांदा बाजार भावात थोडीशी सुधारणा पाहायला मिळाली. यानंतर पुन्हा एकदा कांद्याच्या दरात घसरण झाली. आज देखील राज्यातील अनेक बाजारांमध्ये कांदा बाजार भावात घसरल झाल्याचे पाहायला मिळाले.
यामुळे शेतकरी बांधव मोठ्या आर्थिक अडचणीत आले असून पिकासाठी आलेला खर्च देखील भरून काढता येत नसल्याचे वास्तव आहे. काल सोलापूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 24 पोती कांदा विक्री केल्यानंतर त्याला अवघे 557 रुपये मिळालेत.
विशेष म्हणजे सदर शेतकऱ्याने कांदा पिकासाठी तब्बल 58 हजार रुपयांचा खर्च केला होता. हे प्रकरण समोर आल्यानंतर कांदा उत्पादकांच्या माध्यमातून शासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान आज आपण राज्यातील प्रमुख बाजारांमध्ये कांद्याला काय भाव मिळाला आहे.
दौंड केडगाव कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज कांद्याला किमान 300, कमाल 2000 आणि सरासरी 1400 रुपये भाव मिळाला आहे.
राहता कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज कांद्याला किमान 200, कमाल दोन हजार आणि सरासरी 1500 रुपये भाव मिळाला आहे.
भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज कांद्याला किमान 1200, कमाल 1600 आणि सरासरी 1400 रुपये भाव मिळाला आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात कांद्याला किमान 600, कमाल 1800 आणि सरासरी 1200 रुपये भाव मिळाला आहे.
पुणे मोशी कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात कांद्याला किमान 500, कमाल 1400 आणि सरासरी 950 असा भाव मिळाला आहे.