बोगस रासायनिक खतांमुळे द्राक्षाचे घड जळण्याचा प्रकार माढा तालुक्यात घडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
द्राक्षांच्या बागेसाठी वापरण्यात आलेल्या रासायनिक खतांमुळे द्राक्ष घड जळून गेल्याचा धक्कादायक प्रकार माढा तालु्क्यातील बावी गावात घडला आसून. या प्रकारामुळे माढा तालुक्यातील द्राक्ष बागायतदार शेतकरी धास्तावले आहेत.
बाबी गावातील शेतकऱ्यांचे 35 टनाचे नुकसान झाले आहे. तर 3 हजार हेक्टर हून अधिक क्षेत्रावर द्राक्ष बाग लागवडीचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे या भागातील द्राक्ष बागेचे बोगस रासायनिक खतामुळे द्राक्षी लाखोची नुकसान झाल्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
विजय ज्ञानदेव मोरे या शेतकऱ्याच्या शेतातील द्राक्ष बागेत हा प्रकार घडला आहे. तर त्यांनी घडलेल्या प्रकाराबाबत कृषी आयुक्तालयाकडे तक्रार दाखल केली. असून कृषी विभागाने तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली व त्या रासायनिक खत दुकानदारांचा परवाना देखील रद्द करण्यात आला आहे.
मोरे यांच्या शेतात “ग्रीन ॲग्रो टेक” या कंपनीचा बोगस रासायनिक खताचा प्रकार उघडकीस आला आहे.तर
या कंपनीच्या विरोधात खताच्या दुकानदाराच्या विरोधात खते घेतलेल्या पावतीसह रीतसर तक्रार दाखल करण्यात आली आहे.
खतांच्या निकृष्टतेमुळे घडलेल्या प्रकाराची कृषी विभागाकडून दखल घेत. कृषी विभागाच्या पथकातील तज्ञांनी लॅब मध्ये खताची तपासणी केली असता. पथकाला अनेक गोष्टी आढळून आल्याने संबंधित दुकानदाराचा परवाना रद्द केला आहे.
ही खते बोगस असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे शेतकरी विजय मोरे याचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले. तरी बोगस खतामुळे झालेल्या नुकसानीस कंपनी जबाबदार असल्याने कंपनीवर गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून नुकसानभरपाई मिळण्याची मागणी विजय मोरे यांनी केली आहे.
बोगस खतांमुळे विजय मोरे या शेतकऱ्याचे दीड एकर बागेतील 12 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तर खतांमध्ये 70 अन्नद्रव्यांचे प्रमाण कमी असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.