Worlds Wide Highway : महाराष्ट्रासहित संपूर्ण देशात गेल्या काही वर्षांमध्ये विविध महामार्गांची कामे पूर्ण झाली आहेत. शेकडो किलोमीटर लांबीचे महामार्ग आपल्या भारतात विकसित झाले आहेत.
विशेष म्हणजे अजूनही अनेक महामार्गांचे कामे आपल्या देशात सुरू आहेत. तसेच काही महामार्गांची कामे ही अंतिम टप्प्यात आली आहेत. जगातही हजारो किलोमीटर लांबीचे अनेक महामार्ग आपल्याला पाहायला मिळतात.
तुम्ही जगातील सर्वाधिक लांबीच्या महामार्गाबिषयी ऐकलं देखील असेल, परंतु जगातील सर्वाधिक रुंदीचा हायवे कोणता हे तुम्हाला माहिती आहे का? कदाचित तुम्हाला याविषयी माहिती नसेल.
मात्र आज आपण जगातील सर्वाधिकला रुंदीचा हायवे कोणता आहे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया जगातील सर्वाधिक रुंदीचा हायवे आणि त्याची लांबी किती आहे.
जगातील सर्वाधिक रुंदीचा हायवे कोणता?
मीडिया रिपोर्ट नुसार, 1960 मध्ये जगातील सर्वाधिक रुंदीचा मार्ग तयार करण्यात आला. हा मार्ग ब्राझीलमध्ये आहे. दक्षिण अमेरिकन कंट्री ब्राझीलमध्ये जगातील सर्वाधिक रुंदीचा हायवे विकसित करण्यात आला आहे.
या मार्गाची रुंदी ही खूपच अधिक आहे. खरे तर युरोपियन आणि अमेरिकन कंट्री मोठमोठ्या रुंद आणि प्रशस्त मार्गांसाठी ओळखल्या जातात.
ब्राझील देखील असाच एक शानदार देश आहे. याच देशात जगातील सर्वाधिक रुंदीचा मार्ग तयार करण्यात आला आहे.
या जगातील सर्वाधिक रुंदीच्या मार्गास मॉन्युमेंटल ॲक्सिस असे नाव देण्यात आले आहे. हा मार्ग ब्राझीलच्या राजधानीत तयार करण्यात आला आहे.
ब्राझीलची राजधानी ब्रासीलिया येथील म्युनिसिपल प्लाझा ते प्लाझा ऑफ द थ्री पॉवर्स यादरम्यान जगातील सर्वाधिक रुंदीचा मार्ग विकसित करण्यात आला आहे.
या मार्गाची रुंदी 820 फूट एवढी आहे. म्हणजेच या मार्गाची रुंदी 250 मीटर एवढी आहे. युरोपियन आणि अमेरिकन देशांप्रमाणेच चीनमध्ये देखील मोठ्या प्रमाणात रुंद सडक तयार केली जाते.