Worlds Longest Highway : आपल्या देशात गेल्या काही वर्षांमध्ये रस्त्यांची कामे वेगाने मोठ्या प्रमाणात झाली आहेत. सध्या आपल्या राज्यात सुद्धा महामार्गाची कामे वेगाने सुरू आहेत. आपल्या राज्यातही महामार्गाचे जाळे विकसित केले जात आहे. राजधानी मुंबई ते उपराजधानी नागपूर दरम्यान महामार्ग विकसित केला जात आहे.
हा महामार्ग जवळपास 701 किलोमीटर लांबीचा आहे. या मार्गाचे जवळपास सहाशे किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. जेव्हा या संपूर्ण महामार्गाचे काम पूर्ण होईल तेव्हा हा राज्यातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग म्हणून ओळखला जाणार आहे.
दुसरीकडे राष्ट्रीय महामार्ग-44 (NH-44) हा देशातील सर्वात लांबीचा महामार्ग म्हणून ओळखला जात आहे. त्याची लांबी 3,745 किलोमीटर आहे. हा मार्ग कन्याकुमारीपासून सुरू होतो आणि श्रीनगरपर्यंत जातो.
मात्र तुम्हाला जगातील सर्वात लांब हायवे कोणता आहे? याविषयी माहिती आहे का ? कदाचित तुम्हाला याबाबत माहिती नसेल. त्यामुळे आज आपण जगातील सर्वाधिक लांबीचा हायवे कोणता आहे आणि हा आहे कुठे आहे याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
जगातील सर्वाधिक लांबीचा हायवे कोणता ?
पॅन-अमेरिकन हायवे हा महामार्ग जगातील सर्वाधिक लांबीचा मार्ग म्हणून ओळखला जातो. हा महामार्ग अमेरिकेपासून सुरू होऊन दक्षिण अमेरिकेतील अर्जेंटिनाला जातो. याला जगातील सर्वात लांब रस्त्यांचे जाळे म्हटले जाते. हा मार्ग 14 देशांमधून जाते.
हा महामार्ग उत्तरेकडून दक्षिणेकडे बांधलेला आहे. या मार्गाचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील नोंदवले गेले आहे. या मार्गाची एकूण लांबी 30,000 किमी आहे. हा महामार्ग बांधण्याचे काम 1923 मध्ये सुरू झाले.
त्याचा काही भाग अजूनही बांधायचा बाकी आहे. हा असा महामार्ग आहे जो 14 देशांमधून जातो. हा मार्ग एकूण 14 देशांनी मिळून हा महामार्ग बनवला आहे.
अमेरिका, पेरू, पनामा, निकाराग्वा, मेक्सिको, होंडुरास, ग्वाटेमाला, एल साल्वाडोर, कोस्टा रिका, कोलंबिया, चिली, कॅनडा, बोलिव्हिया आणि अर्जेंटिना अशी या देशांची नावे आहेत. अनेक देशांमध्ये हा महामार्ग तयार करण्यासाठी अमेरिकेने मदत केली आहे.
वास्तविक, हा संपूर्ण महामार्ग कोणताही अडथळा नसलेला आहे. पण याचा जवळपास 110 किलोमीटर लांबीचा मार्ग अद्याप पूर्ण झालेला नाही. हा भाग खूपच धोकादायक मानला जातो. हा भाग पनामा आणि कोलंबिया दरम्यान आहे.
या भागाला डॅरियन गॅप म्हणतात. वास्तविक, अपहरण, अंमली पदार्थांची तस्करी यासारखे अनेक बेकायदेशीर काम या परिसरात केले जात असल्याचे सांगितले जात आहे.