नुकत्याच सादर करण्यात आलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली व या योजनेच्या माध्यमातून सरकार महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत देणार आहे व ही मदत थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. आपल्याला माहित आहे की राज्यातील 21 ते 65 वर्ष वयोगटातील सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यासाठीची अर्ज प्रक्रिया सध्या सुरू झाली असून मोठ्या प्रमाणावर महिला वर्गाकडून या योजनेला प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे.
यामध्ये ज्या महिला महाराष्ट्र सरकारच्या या योजनेसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अशा माध्यमातून अर्ज करत आहेत त्यातील पात्र लाभार्थी महिलांची नावे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यादी शासकीय योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. या प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या यादीमध्ये जे नावे येतील त्या लाभार्थी महिलांना या योजनेचा पहिला हप्त्याचे वितरण सप्टेंबर महिन्यात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अर्थात डीबीटी च्या माध्यमातून केले जाणार आहे.
यादीत तुमचे नाव आहे की नाही हे कसे पहाल?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यादीमध्ये तुमचं नाव पाहण्यासाठी तुम्हाला या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. त्यानंतर मुखपृष्ठावरील लाभार्थी यादी या लिंकवर क्लिक करावे लागेल. लिंकवर क्लिक केल्यानंतर त्यापुढे तुमचा जिल्हा तसेच तालुका, तुमचे गाव आणि प्रभाग निवडावा लागेल आणि खाली दिलेल्या चेकलिस्ट या बटनावर क्लिक करावे लागेल. या ठिकाणी क्लिक केल्यावर या योजनेच्या लाभार्थ्यांची यादी तुम्हाला दिसायलाच लागेल. या यादीत तुम्ही तुमचे नाव आहे की नाही ते तपासू शकतात.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कधी येणार व कधी मिळणार या योजनेचे पैसे?
या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट असून त्यानंतर म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये या योजनेच्या लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध केली जाण्याची शक्यता आहे व या योजनेच्या पहिल्या हप्त्याचे पैसे सप्टेंबरच्या शेवटच्या तारखेपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होतील. यामध्ये ज्या महिलांनी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज केले आहेत अशा सर्व पात्र महिलांची यादी सरकारकडून प्रसिद्ध होईल व यामध्ये ज्या महिलांची नावे समाविष्ट केलेले असतील त्यांना या योजनेचा पहिला हप्ता सप्टेंबर महिन्यात दिला जाणार आहे.
टीप- अजून पर्यंत सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अधिकृत वेबसाईट आणि अर्ज ऑनलाईन लिंक सक्रिय करण्यात आलेली नाही व लवकरच ती सक्रिय केली जाईल अशी एक शक्यता आहे. सध्या तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येतो व नारीशक्ती ॲपच्या माध्यमातून देखील अर्ज भरता येऊ शकतो.