Monsoon 2024 : मे महिन्याचा पहिला पंधरवडा उलटत चालला आहे. आज अक्षय तृतीयाचा मोठा सण देखील साजरा होत आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त अर्थातच अक्षय तृतीयेचा मुहूर्त. अक्षय तृतीया झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांत मान्सूनचे आगमन होत असते.
यामुळे यंदा मान्सूनचे आगमन कधी होणार हा मोठा सवाल आता शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे. सध्या शेतकऱ्यांच्या नजरा मान्सूनकडे लागल्या आहेत. शेतकरी बांधव आपल्या परिवारासमवेत शेत शिवारात पूर्व मशागतीची कामे करत आहेत.
आज अक्षय तृतीयाचा मोठा सण असतानाही शेतकरी बांधव आपल्या परिवारासमवेत शेतशिवारात लगबग करत असल्याचे दृश्य अनेक ठिकाणी नजरेस पडले आहे. खरे तर गेल्यावर्षी अर्थातच 2023 मध्ये मान्सून काळात अपेक्षित असा पाऊस झालेला नाही.
यामुळे यंदा तरी मान्सून काळात चांगला पाऊस झाला पाहिजे अशी इच्छा शेतकऱ्यांची आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी भारतीय हवामान खात्याने यावर्षी चांगला पाऊस राहणार असा अंदाज दिला आहे. यामुळे शेतकरी बांधव मोठे प्रसन्न आहेत. अशातच काही हवामान तज्ञांनी यंदा मान्सूनचे वेळेआधीच आगमन होऊ शकते असे म्हटले आहे.
यामुळे खरंच मान्सून वेळेआधीच दाखल होणार का हा सवाल आहे. दरम्यान याच संदर्भात ज्येष्ठ हवामान अभ्यासक रामचंद्र साबळे यांनी माहिती दिली आहे. साबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या नैऋत्येकडून वारे वाहू लागले असून वाऱ्याचा ताशी वेग देखील वाढला आहे.
विशेष बाब अशी की हवेतील बाष्पाचे प्रमाण देखील आता वाढले असून ही गोष्ट मान्सून आगमनासाठी अनुकूल ठरत आहे. यावरून मान्सूनच्या आगमनाची तयारी सुरू झाल्याचे दिसत आहे. साबळे यांनी यंदा मानसून दक्षिण अंदमानातं वेळे आधीच पोहचू शकतो असे म्हटले आहे.
एकंदरीत मान्सून वेळेआधीच पोहोचणार या वृत्ताला साबळे यांनी दुजोरा दिला आहे. त्यांनी यावर्षी 17 किंवा 18 मे ला मानसून दक्षिण अंदमानात दाखल होणार अशी माहिती दिली आहे. दरवर्षी दक्षिण अंदमानात 20 किंवा 21 मे ला मान्सून आगमन होत असते.
यावर्षी मात्र दोन ते तीन दिवस अगोदरच अंदमानात Mansoon पोहचणार आहे. विशेष म्हणजे केरळमध्ये देखील नियोजित वेळेच्या दोन-तीन दिवस अगोदरच मान्सून दाखल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यामुळे शेतकऱ्यांसाठी ही एक मोठी आनंदाची वार्ता राहणार आहे.