केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून विविध प्रकारच्या घरकुल योजना राबवल्या जात असून या योजनांच्या माध्यमातून देशातील बेघर असलेल्या नागरिकांना स्वतःच्या हक्काची पक्की घरी उपलब्ध करून दिली जातात व अशा प्रकारचे घर बांधण्यासाठी या योजनांच्या माध्यमातून आर्थिक अनुदान किंवा आर्थिक मदत दिली जात असते.
यामध्ये केंद्र सरकारची पंतप्रधान आवास योजना ही एक महत्त्वाची योजना आहे व त्यासोबतच महाराष्ट्र सरकारच्या शबरी आवास योजना किंवा रमाई आवास योजनेसारख्या योजना देखील खूप महत्त्वाच्या आहेत.
राज्य सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या योजनांच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना घर घेण्यापासून तर घरासाठी जागा घेण्यापर्यंत आर्थिक मदत दिली जाते व या माध्यमातून अनेकांचे स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण होते.
याच योजनेच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे संकेत दिले असून नेमके याबाबतीत देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटले? याबाबतची माहिती बघू.
घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना मिळणार सोलर च्या माध्यमातून मोफत वीज?
केंद्र सरकारची पीएम आवास योजना व त्यासोबतच राज्य सरकार पुरस्कृत ज्या काही आवास योजना आहेत त्या माध्यमातून जर घर बांधले तर त्या लाभार्थी कुटुंबाला सौर ऊर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेतला जाईल अशा प्रकारचे संकेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते व त्यावेळी त्यांनी राज्यातील महत्त्वाचे असलेले सिंचन प्रकल्प तसेच घरकुल योजना इत्यादी मुद्द्यांवर आपले विचार मांडले. यावेळी बोलताना त्यांनी म्हटले की, शबरी आवास योजना तसेच प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजनेसारख्या इतर सगळ्या योजनांमधून जी घर होती त्या घरांना सोलर द्यायचा.
जेणेकरून त्या घरात राहणारे जे काही कुटुंब आहेत त्यांना विजेचे बिल येऊ नये व त्यांना मोफत वीज मिळावी हा आमचा प्रयत्न पुढील काळात असणार आहे असे त्यांनी म्हटले. राज्य सरकारच्या योजनांमध्ये जर आपण बघितले तर रमाई आवास योजना,
शबरी आवास योजना, आदिम आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, पारधी आवास योजना आणि धनगर आवाज योजनेसारख्या इतर योजना राज्यामध्ये राबविण्यात येतात.
या राज्य पुरस्कृत योजना असून या योजनांसाठी जो काही निधी लागतो तो राज्य सरकार देते व याच योजनांच्या माध्यमातून राज्यातील बेघर कुटुंबांना घरे उपलब्ध करून दिली जातात. आता या घरांसोबतच अशा कुटुंबांना सौर ऊर्जा देण्यासाठी देखील राज्य सरकार प्रयत्न करणार आहे.
पंतप्रधान आवास योजनेच्या 13 पैकी तीन अटी शिथिल
देशाचे केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पंतप्रधान आवास योजनेतील प्रमुख 13 अटीपैकी तीन अटी शिथिल करण्याची घोषणा केली व त्यानुसार आता या योजनेतून दोन हेक्टर पेक्षा जास्त जमीन असेल आणि ती सिंचनाखाली असेल तरीदेखील असे शेतकरी या योजनेस पात्र ठरणार आहेत.
तसेच पाच एकर म्हणजे दोन हेक्टर कोरडवाहू जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना देखील आता पीएम आवास योजनेतून घरकुल मिळणार आहे. जसे अगोदर ज्यांच्याकडे फ्रीज किंवा लँडलाईन फोन, सोबत दुचाकी देखील आहे
अशा कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळत नव्हता. परंतु आता अशा व्यक्तींना देखील या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.अशाप्रकारे जास्तीत जास्त नागरिकांना आता पीएम आवास योजनेच्या माध्यमातून घरांचा लाभ मिळणार आहे.