भारतात खरीप हंगामात खताला सर्वाधिक मागणी असते.तर यंदाच्या वर्षी रशियातील युद्धजन्य परिस्थिती मुळे खताची आणि कच्च्या मालाची आवकच झालेली नाही.
त्यामुळे हंगामात खत टंचाई निर्माण होणार आहे. शेतकऱ्यांना खत टंचाईची अधिक झळ बसू नये कृषी विभागाकडून नियोजन करण्यात येणार आहे. ओढावलेली परस्थिती लक्षात घेता उपलब्ध साठ्याचा योग्य वापर आणि खत विक्रीचे नियम या अनुशंगाने कृषी अधिकाऱ्यांकडून बैठका घेण्यात येत आहेत.
त्यात रासायनिक खत विक्रेत्यांना आधार कार्ड धारक शेतकऱ्यांना ई-पॉस मशीनद्वारेच खताची विक्री करावी लागणार आहे. शिवाय एमआरपी पेक्षा जास्त किमतीने खताची विक्री केल्यास कारवाई केली जाणार असल्याचेही कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
तर खरीप हंगामासाठी लागणाऱ्या खतांची खरेदी ही शेतकऱ्यांनी आताच करून घेण्याचे विभागाकडून सांगण्यात आले आहे.तर डीएपी खताचा साठा विक्रत्यांकडे असेल तर तात्काळ त्याची विक्री करावी लागणार आहे.
यंदाच्या वर्षी खत टंचाई असल्यामुळे शेतकऱ्यांनी रासायनिक खतांच्या जोडीला सेंद्रिय खताचा वापर वाढवून ह्या वर्षी योग्य नियोजनातूनच शेतकऱ्यांना मार्ग काढण्याची गरज आहे.