भारत हा निसर्ग सौंदर्याने नटलेला देश असून भारताच्या तुम्ही कुठल्याही भागात जाल तरी तुम्हाला निसर्ग सौंदर्याने परिपूर्ण असे दृश्य पाहायला मिळते. भारतामध्ये असे एकही राज्य नाही की त्याला निसर्गाने भरभरून दिलेले नाही. भारत हा डोंगरदर्यांनी वेढलेला आणि हिरवाईची चादर पांघरलेला देश आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. त्यामुळे भारतामध्ये पर्यटनाला खूप मोठा भाव आहे.
भारताला अनेक प्रकारच्या डोंगर दर्या तसेच अनेक हिल स्टेशन लाभले असून त्यातील महत्त्वाचे म्हणजे गुलमार तसेच मनाली व बिरबिलिंग यासारख्या प्रसिद्ध हिल स्टेशनचा समावेश करता येईल. या व्यतिरिक्त आपण मनाली किंवा कुलू आणि महाबळेश्वरपेक्षा निसर्ग सौंदर्याने नटलेली सुंदर आणि आकर्षक हिल स्टेशनची माहिती या लेखात घेणार आहोत.
भारतातील महत्त्वाची हिल स्टेशन
1- चक्रता हिल स्टेशन- हे हिल स्टेशन उत्तराखंड राज्यामधील असून हे एक निसर्गाने नटलेले असे हिल स्टेशन आहे. हिरवेगार डोंगर आणि जंगलांनी वेढलेले हे हिल स्टेशन असून निसर्ग सौंदर्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. टायगर फॉल्स आणि ट्रेकिंग ट्रेल्स करिता चक्रीता हील स्टेशन खूप प्रसिद्ध आहे.
2- मावलिननांग हिल स्टेशन- हे हिल स्टेशन मेघालय राज्यात असून डोंगररांगांवर आणि हिरव्यागार वनराईमध्ये असलेले हे एक सुंदर ठिकाण आहे. या ठिकाणची भेट खरंच एक आनंददायी अनुभव ठरू शकतो. त्यामुळे तुमची जर एखाद्या हिल स्टेशनला भेट द्यायची इच्छा असेल तर तुमच्यासाठी हा पर्याय महत्त्वाचा आहे.
3- कासोल हिल स्टेशन- हे हिल स्टेशन हिमाचल प्रदेश राज्यात असून डोंगररांगांमध्ये वसलेल्या उत्तम आणि निसर्गाने नटलेले असेल स्टेशन आहे. या ठिकाणचे निसर्ग सौंदर्य डोळ्यात भरण्यासारखे असून तुम्ही जर साहसी ट्रेकिंगसाठी व साहसी सहलीसाठी उत्सुक असाल तर हे ठिकाण तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे.
4- इडुक्की हिल स्टेशन- हे हिल स्टेशन भारतात असून केरळ राज्यांमध्ये स्थित आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेले आहे एक प्रसिद्ध स्टेशन असून या ठिकाणचे नैसर्गिक दृश्य डोळ्यात भरण्यासारखे आहे.
5- कृर्सीयांग हिल स्टेशन- हे पश्चिम बंगाल राज्यामध्ये असलेले हिल स्टेशन स्वर्गापेक्षा सुंदर असे संबोधले जाते.या ठिकाणी तुम्हाला अनेक प्रकारच्या चहाच्या बागा बघायला मिळतात जे निसर्ग सौंदर्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर भर घालतात. उन्हाळ्याच्या सुट्ट्या जर तुम्हाला एन्जॉय करायचे असतील तर तुमच्याकरिता हे हिल स्टेशन खूप उत्तम पर्याय आहे.
6- कन्नूर हिल स्टेशन- हे हिल स्टेशन तामिळनाडू राज्यांमध्ये असून दक्षिण भारतातील एक महत्त्वाचे हील स्टेशन म्हणून याला ओळखले जाते. या ठिकाणी तुम्हाला चहाच्या मळे व खूप सुंदर अशी दृश्य बघायला मिळतात. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तुमची जर बाहेरच्या राज्यातील हिलस्टेशन पाहायची इच्छा असेल तर तुम्ही या हिल स्टेशनला भेट देऊ शकतात.