शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ! गव्हाच्या बाजारभावात होणार विक्रमी वाढ, केव्हा वाढणार दर ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Wheat Rate : गहू हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक मुख्य अन्नधान्य पीक आहे. गव्हाची रब्बी हंगामात पेरणी केली जाते. या रब्बी हंगामात देखील गव्हाची पेरणीखालील क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. गव्हाची पेरणी साधारणता नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात केली जाते.

एक नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान गव्हाची वेळेवर पेरणी होते आणि 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर दरम्यान पसात गहू पेरणी केली जाते. दरम्यान, महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरातील गहू उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे आगामी काळात गव्हाचे बाजारभाव वाढण्याचे संकेत मिळत आहेत.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

खरंतर गेल्या काही दिवसांपासून गव्हाचे बाजार भाव तेजीत आहेत. केंद्र सरकारने गव्हाच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत. पण अनेक यशस्वी प्रयत्नांनंतरही गव्हाच्या दरात होणारी वाढ थांबलेली नाही. भारतीय अन्न महामंडळाने रोलर फ्लोअर मिलला क्षमतेनुसार गहू न दिल्याने, गहू दरात गेल्या काही दिवसांपासून वाढ नमूद केली जात आहे.

तसेच भविष्यातही गव्हाच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या बाजारपेठेत गव्हाची आवक कमी झाली आहे. भविष्यात आवक आणखी कमी होईल असा अंदाज आहे. जोपर्यंत आगामी रब्बी हंगामातील गहू बाजारात येत नाही तोपर्यंत आवक कमी राहण्याची शक्यता आहे.

अशातच भारतात सणासुदीचा काळ सुरु झाला आहे. आज पासून नवरात्र उत्सव सुरू होणार आहे तर पुढील महिन्यात दिवाळीचा मोठा सण साजरा होणार आहे. नवरात्रीच्या काळात गव्हाचे पीठ आणि रव्याची मागणी वाढणार आहे. दिवाळीमध्ये याची मागणी दुपटीने वाढण्याची शक्यता आहे.

यामुळे गहू आणि गव्हाच्या उत्पादनांच्या किमती आणखी वाढू शकतात असा अंदाज आहे. सध्या जयपूरच्या बाजारपेठेत मिल डिलिव्हरीनंतर गहू सुमारे 2545 रुपये प्रति क्विंटल दराने विकले जात आहे. लक्ष्मीभोग पीठ, मैदा, रवा आणि बेसन उत्पादक नरेश चोप्रा म्हणाले की, सरकार गव्हाच्या तेजीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुरेसे प्रयत्न करत आहे.

मात्र शासनाकडून दर आठवड्याला केवळ 100 मेट्रिक टन गहू रोलर फ्लोअर मिलला टेंडरद्वारे दिला जात आहे. जो की मागणीच्या तुलनेत कमी आहे. सध्या गुजरात, महाराष्ट्रात त्याच वेळी, दक्षिण भारतातील रोलर फ्लोर मिलमध्ये गव्हाच्या मागणीत सतत वाढ होत आहे. येथे जोरदार खरेदी सुरू आहे.

परिणामी बाजारपेठेत गव्हाचे भाव वाढले आहेत. गेल्या काही दिवसांत प्रतिक्विंटल 15 ते 20 रुपयांनी वाढ झाली आहे. दरम्यान नवीन गव्हाची आवक होण्यास आणखी सात-आठ महिने बाकी आहेत. त्यामुळे गव्हाचे भाव वाढण्याचे चित्र तयार होत आहे.