Wheat MSP : येत्या काही दिवसात रब्बी हंगामाला (Rabi Season) सुरुवात होणार आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी (Farmer) एक आनंदाची बातमी समोर येत आहे. मित्रांनो रब्बी हंगामासाठी केंद्र शासनाने रब्बी पिकांसाठी सुधारित हमीभाव (Rabi Crop Msp) जारी केले आहेत.
रब्बी हंगामात उत्पादित केले जाणार आहे गहू हे एक मुख्य पीक (Wheat Crop) आहे. गव्हा सोबतच रब्बी हंगामात मोहरी पिकाची (Mustard Crop) देखील संपूर्ण भारत वर्षात मोठ्या प्रमाणात शेती (Farming) केली जाते. या दोन्ही पिकांच्या हमीभावात केंद्र शासनाने वाढ केली आहे.
आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की गव्हाच्या हमीभावात 110 रुपयांची वाढ झाली असून मोहरीच्या हमीभावात 400 रुपयांची वाढ नमूद करण्यात आले आहे. म्हणजेच आता गव्हाला दोन हजार 125 रुपये प्रति क्विंटल एवढा हमीभाव निश्चित करण्यात आला आहे.
तसेच मोहरीला पाच हजार 450 रुपये प्रति क्विंटल एवढा हमीभाव आता लागू होणार आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक व्यवहारावरील कॅबिनेट समितीच्या (सीसीईओ) बैठकीत रब्बी हंगामातील पिकांच्या हमीभावात किंवा एमएसपीमध्ये वाढ करण्याचा शेतकरी हिताचा निर्णय घेण्यात आला आहे.
सध्या, सरकार खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामांत घेतलेल्या 23 पिकांसाठी एमएसपी निश्चित करते. यामध्ये गहू आणि मोहरी या पिकांचा देखील समावेश असतो. दरम्यान ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते नोव्हेंबरच्या पहिल्या दुसरा पंधरवड्यापर्यंत गव्हाची पेरणी आपल्या भारतात केली जाते. अशा परिस्थितीत या हंगामात उत्पादित होणाऱ्या गव्हाच्या पिकाला आता वाढीव एमएसपी मिळणार असल्याने शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
गेल्या वर्षी दोन हजार पंधरा रुपये एवढा हमीभाव गव्हाला लावण्यात आला होता. मात्र आता त्यामध्ये 110 रुपयांची वाढ होऊन दोन हजार 125 रुपये प्रति क्विंटल एवढा हमीभाव गव्हाला मिळाला आहे. दरम्यान एक हजार 65 रुपये प्रति क्विंटल एवढा उत्पादन खर्च गव्हाच्या पिकासाठी शासनाकडून गृहीत धरण्यात आला आहे.
निश्चितच प्रमुख गहू उत्पादक राज्य पंजाब, हरियाणा तसेच मध्य प्रदेश या राज्यांना गव्हाच्या एमएसपीत वाढ झाली असल्याने फायदा होणार आहे. मित्रांनो आपल्या राज्यात देखील गहू लागवडीखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे यामुळे आपल्या राज्यातील भल्या मोठ्या शेतकऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. एकंदरीत या रब्बी हंगामात गहू उत्पादक शेतकरी बांधवांना सुगीचे दिवस येणार आहेत.