गव्हाच्या पिकाला पाणी देताना ‘हे’ 60 रुपयाचे एक लिक्विड टाका ! विक्रमी आणि दर्जेदार उत्पादन मिळणार, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Wheat Farming : गहू हे रब्बी हंगामातील एक महत्त्वाचे पीक आहे. या पिकाची राज्यासह संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. पण अनेकदा शेतकऱ्यांना या पिकातून अपेक्षित असे उत्पादन मिळत नाही. त्यामुळे शेतकरी बांधव अडचणीत येतात त्यांची आर्थिक कोंडी होते.

मात्र आज आपण गव्हाचे उत्पादन वाढवण्यासाठी तज्ञ लोकांनी शिफारस केलेल्या अशा एका खताविषयी जाणून घेणार आहोत ज्याचा वापर केल्यास शेतकऱ्यांना अधिकचे विक्रमी उत्पादन मिळवता येणार आहे.

गव्हाच्या पिकात या औषधाचा वापर करा

खरे तर गव्हाच्या पिकाच्या वाढीसाठी एनपीके अर्थातच नायट्रोजन पोटॅश आणि फॉस्फरस हे तीन घटक खूपच महत्त्वाचे असतात.

या घटकांची जर पूर्तता झाली नाही तर गव्हाच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो आणि याचा परिणाम म्हणून गव्हातून अपेक्षित असे उत्पादन शेतकऱ्यांना मिळवता येत नाही. दरम्यान याच घटकांच्या पूर्ततेसाठी शेतकरी बांधवांना IFFCO चे NPK consortia वापरण्याचा सल्ला दिला जात आहे.

या NPK बाटलीमध्ये आपल्याला NPK असलेले जिवाणू मिळतात ज्याला आपण अझोटोबॅक्टर म्हणतो, त्यासोबत आपल्याला फॉस्फरसयुक्त जीवाणू मिळतात ज्याला आपण PSB म्हणतो आणि तिसरे म्हणजे पोटॅशयुक्त जीवाणू ज्याला आपण KMB म्हणतो.

केव्हा वापर करावा

IFFCO चे NPK consortia गव्हाच्या पिकाला पहिले पाणी देताना पाण्यात टाकले पाहिजे. गव्हाच्या पिकाला पहिले पाणी देतानाचं याचा वापर केला तर गव्हाचे पिक जोमदार वाढते.

मात्र, हे औषध थेट पिकाला द्यावे लागत नाही. तुम्हाला ही बाटली बाजारातून विकत आणल्यानंतर एका ड्रममध्ये 150 ते 200 लिटर पाणी घ्यायचे आहे.

यात 1 किंवा 1.5 किलो गूळ टाकून आणि हे औषध टाकायचे आहे. हे जवळपास आठ दिवस असेच राहू द्या. मग 8 दिवसांनी ते वापरण्यासाठी चालते.

त्यामधील जिवाणू आठ दिवसांनी सक्रिय होतात. जिवाणू सक्रिय झालेत की मग याचा वापर केला जातो. तुम्ही हे द्रावण मग पाण्यात टाकून गव्हाच्या पिकाला देऊ शकता.

पिकाला पहिले पाणी भरताना जर हे द्रावण दिले तर गव्हाची चांगली वाढ होते. विशेष म्हणजे ही अर्धा लिटरची बाटली फक्त 60 रुपयाला मिळते जी की एक एकर क्षेत्रासाठी पुरेशी आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा