Wheat Farming : गहू हे राज्यासह संपूर्ण देशात उत्पादित होणारे एक मुख्य पीक आहे. या अन्नधान्य पिकाची लागवड महाराष्ट्रासह पंजाब, हरियाणा, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश यांसारख्या अनेक प्रांतात केली जाते. यामुळे भारतात गव्हाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत आहे.
विशेष म्हणजे गव्हाची खपत देखील आपल्या भारतात खूपच अधिक आहे. गहू बेकरी प्रॉडक्ट, मैदा, पोळी बनवण्यासाठी तसेच फूड इंडस्ट्री मध्ये वापरले जाते. परिणामी बाजारात गव्हाची मोठी मागणी असते. गेल्या काही वर्षांपासून गव्हाला चांगला भावही मिळत आहे.
गहू हे रब्बी हंगामात उत्पादित होते. यंदा मात्र मान्सून काळात खूपच कमी पाऊस झाला असल्याने रब्बी हंगामातील गहू लागवडीखालील क्षेत्र किंचित कमी होण्याची शक्यता तज्ञ लोकांनी वर्तवली आहे. तथापि ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत चिंतनाची सुविधा उपलब्ध आहे, ज्या शेतकऱ्यांच्या शेतालगत पाट, नदी वाहते ते शेतकरी बांधव रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात गव्हाची लागवड करणार आहेत.
खरे तर आता डिसेंबरचा महिना सुरू झाला आहे. गव्हाची आगात किंवा वेळेवर पेरणी ही नोव्हेंबर महिन्यातच होते. आता डिसेंबर महिन्यात पसात गव्हाची लागवड होणार आहे. पण पसात गहू लागवड करताना शेतकरी बांधवांनी सुधारित जातींची निवड करणे आवश्यक आहे.
यामुळे आता आपण डिसेंबर महिन्यात पेरणी योग्य गव्हाच्या सुधारित जाती कोणत्या आहेत ? याबाबत अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया डिसेंबर महिन्यात पेरणी करता येऊ शकणाऱ्या गव्हाच्या सुधारित जाती.
गहू लागवडीचा योग्य वेळ
ज्या शेतकरी बांधवांना नोव्हेंबर महिन्यात गव्हाची पेरणी करता येणे शक्य होत नाही ते शेतकरी बांधव पसात गव्हाची लागवड करतात. पसात गव्हाची लागवड ही 25 नोव्हेंबर ते 25 डिसेंबर पर्यंत केली जाऊ शकते असं मत कृषी तज्ञांनी व्यक्त केला आहे.
तर काही तज्ञ मात्र 15 डिसेंबर नंतर गव्हाची लागवड शक्यतो टाळली पाहिजे असा मत व्यक्त करतात. दरम्यान उशिराने गव्हाची पेरणी करण्यासाठी अर्थातच पसात गहू पेरणी करण्यासाठी 120 ते 125 किलोग्रॅम बियाणे वापरले पाहिजे. कमी बियाणे वापरल्यास उत्पादनात घट येऊ शकते.
पसात गव्हाच्या सुधारित जाती
डिसेंबर महिन्यात गहू लागवड करायची असेल तर HD 3271, HD 3018, HD 3167, HD 3117 आणि HD 3118 या वाणांची पेरणी केली जाऊ शकते. पुसा शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या या पसात गव्हाच्या वाणांची पेरणी केल्यास उशिराने लागवड झाली असली तरीदेखील बऱ्यापैकी उत्पादन मिळू शकते.
तथापि या वानाची लागवड 25 डिसेंबर नंतर करू नये. 25 डिसेंबर नंतर गव्हाची पेरणी केली जात नाही.
HI 1621, HI1563, HI 1977 या गव्हाच्या वाणाची ज्या ठिकाणी पाण्याची कमी उपलब्धता आहे तिथे पेरणी केली पाहिजे. जर तुमच्याकडे गव्हाच्या पिकाला देण्यासाठी मुबलक पाणी नसेल तर तुम्ही या वाणाची पेरणी करू शकतात असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.