गव्हाच्या पिकाला दुसरे पाणी देतांना ‘या’ खताचा वापर करा, मिळणार विक्रमी उत्पादन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Wheat Farming : गहू हे रब्बी हंगामातील मुख्य पीक आहे. या पिकाची संपूर्ण राज्यात शेती केली जाते. राज्यातील मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र  या विभागात गव्हाची पेरणी केली जात आहे. दरम्यान, या हंगामात देखील गव्हाची मोठ्या प्रमाणात पेरणी करण्यात आली आहे.

सध्या राज्यासह देशातील अनेक शेतकरी गहू पिकाला दुसरे सिंचन देणार आहेत. गव्हाला साधारण ५० ते ६० दिवसांनी दुसरे पाणी दिले जाते. मात्र, राज्यातील अनेक गहू उत्पादक शेतकऱ्यांच्या माध्यमातून गव्हाला दुसरे पाणी पिताना कोणते खत वापरावे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

पिकाला अधिक लोंब्या लागाव्यात आणि गव्हाचा पिवळसरपणाही पूर्णपणे नाहीसा व्हावा यासाठी कोणती खते वापरावी लागतील ? असे प्रश्न उत्पादकांच्या माध्यमातून उपस्थित केले जात आहे.

तसेच जर पीक सामान्य असेल तर दुसरे पाणी देतांना कोणती खत वापरले पाहिजे असा देखील सवाल अनेकांनी विचारला आहे. त्यामुळे आज आपण शेतकऱ्यांच्या या महत्त्वाच्या प्रश्नांविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

गव्हातील पिवळसरपणा दूर करण्यासाठी कोणते खत वापरणार 

कृषी तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, गहू पिकात पिवळसरपणा अनेक कारणांमुळे येतो. उदाहरणार्थ, जर तुमची जमीन चिकणमाती युक्त असेल तर गहू पिकात पिवळसरपणा येतो. तसेच जास्त पाण्यामुळे, शेतात वाळवी आल्याने, तणनाशकांचा वापर केल्याने किंवा शेतात पोषण घटक नसल्यामुळे देखील गव्हाचे पीक पिवळे पडू शकते.

दरम्यान जर वरीलपैकी कोणत्याही कारणामुळे तुमच पिक पिवळ पडल असेल तर तुम्ही यासाठी फवारणी करू शकणार आहात. यासाठी तुम्हाला ह्युमिक अॅसिड ५०० मिली + चेलेटेड झिंक १०० ग्रॅम + मॅग्नेशियम सल्फेट १ किलो आणि बोरॉन १०० ग्रॅम २०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी लागणार आहे.

हे प्रमाण एक एकर जमिनीसाठी राहणार आहे याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी. या औषधंची फवारणी केल्यास तुमच्या गव्हाच्या पिकातील पिवळसरपणा लवकर दूर होईल.

गव्हासाठी दुसरे पाणी देतांना कोणते खत वापरले पाहिजे 

आपण पाणी देण्यापूर्वी किंवा पाणी दिल्यानंतर गव्हाला खत देऊ शकता. दरम्यान कृषी तज्ञांनी पाणी दिल्यानंतर खत द्यावे असे सांगितले आहे. कृषी तज्ञ म्हणतात की, ओल्या जमिनीत खत दिल्यास पिकाला जास्त फायदा मिळतो.

म्हणजे जमीन कोरडी असल्यास खत देऊ नये. दरम्यान जाणकार लोकांनी गव्हाला दुसरे पाणी देण्यापूर्वी 10 किलो सागरिका प्रति एकर युरिया आणि 5 किलो मॅग्नेशियम सल्फेट प्रति एकर मिसळून आपल्या शेतात टाकन्याचा सल्ला दिला आहे.

जर तुम्ही पूर्वी खतामध्ये सागरिकाचा वापर केला असेल तर अशावेळी तुम्ही या खतासह 6 किलो झिंक 33% आणि 3 किलो सल्फर 90% प्रति एकर टाकू शकता. यामुळे तुमच्या लोंब्याची वाढ होईल आणि तुमच्या शेतातील पीक हिरवेगार राहणार आहे. या खताचा वापर केल्यास पिकातून चांगले उत्पादन मिळवता येणे शक्य होणार आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा