शेतकऱ्यांसाठी कामाची बातमी; गव्हाच्या ‘या’ वाणांची पेरणी 15 डिसेंबर पर्यंत करता येते, उत्पादनही विक्रमी मिळते, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Wheat Farming : गहू हे महाराष्ट्रसहित देशातील विविध भागांमध्ये उत्पादित होणारे एक मुख्य पीक आहे. या पिकाची पंजाब हरियाणा राजस्थान उत्तर प्रदेश मध्यप्रदेश तामिळनाडू कर्नाटक यांसारख्या विविध राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.

आपल्या राज्यातही गहू लागवडीखालील क्षेत्र काही कमी नाही. यंदा मात्र दुष्काळी परिस्थिती पाहता महाराष्ट्रातील गहू लागवडीखालील क्षेत्र बऱ्यापैकी कमी होणार असा अंदाज आहे. तसेच ज्या भागात पेरणी होणार आहे तेथे देखील गव्हाचे उत्पादन कमी पाण्यामुळे घटू शकते असा अंदाज आहे.

तथापि ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत पाण्याची सोय उपलब्ध आहे आणि मान्सून काळात चांगला पाऊस बरसला आहे त्या शेतकऱ्यांना गव्हाच्या पिकातून यंदाही चांगले उत्पन्न मिळणार आहे.

तर गव्हाची वेळेवर पेरणी ही एक नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान केली जाते.नोव्हेंबर चा पहिला पंधरवाडा हा वेळेवर गहू पेरणीसाठी सर्वोत्कृष्ट असल्याचा दावा तज्ञांनी केला आहे.

विशेष म्हणजे या कालावधीत जर गव्हाची पेरणी केली तर चांगले उत्पादन मिळते. पण उशिराने गहू पेरला तर उत्पादनात घट होत असते.

दरम्यान ज्या शेतकऱ्यांना वेळेवर गहू पेरणी करता येत नाही ते शेतकरी बांधव 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीत उशिरा येणाऱ्या गव्हाची पेरणी करता. दरम्यान आता आपण उशिरा पेरणीसाठी उपयुक्त असणाऱ्या गव्हाच्या एका सुधारित वाणाची माहिती जाणून घेणार आहोत.

फुले समाधान : फुले समाधान किंवा एनआयएडब्ल्यू 1994 हा गव्हाचा एक सुधारित वाण आहे. हा वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथून विकसित झाला आहे. या जातीची एक विशेषता म्हणजे ही जात वेळेवर पेरणीसाठी आणि उशिराने पेरणीसाठी उपयुक्त ठरते.

या जातीची एक नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर आणि 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीमध्ये पेरणी होऊ शकते. या जातीची संपूर्ण महाराष्ट्रासाठी शिफारस करण्यात आली आहे. ग

व्हाची ही जात तांबेरा रोगास प्रतिकारक आहे. तसेच मावा किडीला देखील हा वाण प्रतिकारक आहे. गव्हाचा हा वाण नाहीतर प्रचलित वाणापेक्षा लवकर परिपक्व होत असतो.

ही जात इतर जातींपेक्षा दहा दिवस लवकर परिपक्व होते.या जातीची वेळेवर पेरणी केली तर हेक्टरी 46 क्विंटल एवढे उत्पादन मिळते आणि उशिराने पेरणी केली तर 44 क्विंटल उत्पादन मिळते.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा