काय सांगता ! नव्याने विकसित झालेल्या गव्हाच्या ‘या’ वाणाची जानेवारी महिन्यापर्यंत करता येणार पेरणी, वाचा डिटेल्स

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Wheat Farming : सध्या राज्यासह संपूर्ण देशात रब्बी हंगाम सुरू आहे. अनेक भागात रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा या मुख्य पिकाची पेरणी देखील पूर्ण झाली आहे. तर काही ठिकाणी अजूनही पेरणीची कामे सुरू आहेत.

खरंतर गव्हाच्या बाबतीत बोलायचं झालं तर याची पेरणी ही नोव्हेंबर महिन्यातच पूर्ण केली जाते. मात्र काही शेतकऱ्यांना नोव्हेंबर मध्ये गहू पेरणी करता येत नाही. अशा परिस्थितीत अनेक शेतकरी पसात गव्हाची पेरणी करतात.

डिसेंबरच्या अखेरपर्यंत शेतकऱ्यांच्या माध्यमातून पसात गव्हाची पेरणी केली जाते. काही ठिकाणी तर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सुद्धा पेरणी केली जात आहे. मात्र गव्हाची उशिराने पेरणी केली म्हणजेच पसात पेरणी केली तर उत्पादनात मोठी घट येते.

यामुळे याची वेळेवर पेरणी करण्याचा सल्ला दिला जातो. जे शेतकरी गव्हाची वेळेवर पेरणी करतात त्यांना चांगल्यापैकी उत्पादन मिळते. पण उशिरा गहू पेरला तर उत्पादनात मोठी घट येऊ शकते.

तथापि, जर शेतकऱ्यांनी काही सुधारित वाणाची पेरणी केली तर उत्पादनातील घट कमी केली जाऊ शकते. यामुळे आज आपण डिसेंबर महिन्यात पेरणी करता येणाऱ्या गव्हाच्या काही प्रमुख जातींची थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

डिसेंबर महिन्यात पेरणी करता येणाऱ्या गव्हाच्या प्रमुख जाती खालील प्रमाणे

HD-3271 : हा वाण भारतीय कृषी संशोधन संस्था (पुसा), दिल्ली यांनी विकसित केला आहे. या जातीची देशातील अनेक प्रमुख उत्पादक राज्यांमध्ये पेरणी केली जाते. ही जात उशिरा पेरणीसाठी उपयुक्त आहे.

मीडिया रिपोर्ट नुसार गव्हाच्या या वाणाची 10 डिसेंबर ते 5 जानेवारी या कालावधी दरम्यान पेरणी केली जाऊ शकते. या जातीपासून सरासरी 17 ते 18 क्विंटल प्रति एकर एवढे उत्पादन सहजतेने मिळत असल्याचा दावा केला जात आहे.

एचडी-३२९८ : गव्हाचा हा देखील एक सुधारित वाण आहे. हा वाण पुसा विद्यापीठ दिल्लीने विकसित केला आहे. विशेष म्हणजे हा वाण अलीकडेच विकसित झाला आहे. नव्याने विकसित झालेला गव्हाचा हा सुधारित वाण १ डिसेंबर ते १० जानेवारी या कालावधीत पेरता येतो.

कृषी तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार पेरणीनंतर या गव्हाच्या जातीला पक्व होण्यास १२० ते १३० दिवसांचा कालावधी लागू शकतो. या जातीपासून सुमारे 17 ते 20 क्विंटल प्रति एकर एवढे उत्पादन मिळत असल्याचा दावा तज्ञांनी केला आहे.

याशिवाय, एचडी-2851, श्रीराम-231, SW-26, श्रीराम-252 या काही सुधारित वाणांची देखील डिसेंबर महिन्यात पेरणी केली जाऊ शकते. तथापि शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व कृषी तज्ञांशी चर्चा करूनच सुधारित जातींची निवड केली पाहिजे जेणेकरून त्यांना चांगले उत्पादन मिळवता येईल. 

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा