रब्बीमध्ये गव्हाच्या ‘या’ वाणाची शेती सुरु करा, 3 पाणी दिले तरी मिळणार 60 क्विंटलपर्यंतचे उत्पादन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Wheat Farming : यावर्षी मान्सून काळात खूपच कमी पाऊस झाला आहे. राज्यात जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या चार महिन्याच्या काळात अपेक्षित असा पाऊस झालेला नसल्याने खरीप हंगामातून शेतकऱ्यांना फारच कमी उत्पादन मिळालेले आहे.

सोयाबीन, कापूस समवेच सर्वच पिकांच्या उत्पादनात घट आली आहे. शिवाय रब्बी हंगामावर पण याचा विपरीत परिणाम होणार आहे. कमी पावसामुळे राज्यातील अनेक भागामध्ये रब्बी पिकाची पेरणी झालेली नाही.

रब्बी हंगामातील गहू पिकाच्या पेरणीवर देखील कमी पावसाचा परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत यंदाच्या हंगामात कमी पाण्यात तयार होणाऱ्या गव्हाच्या जातींची पेरणी करण्याचा सल्ला दिला जात आहे.

खरे तर गव्हाची नोव्हेंबर महिन्यात पेरणी केली जाते. मात्र ज्या शेतकऱ्यांना वेळेवर गव्हाची पेरणी करता येत नाही ते शेतकरी बांधव 25 डिसेंबर पर्यंत गव्हाची पेरणी करू शकतात. अशावेळी गव्हाच्या उशिराने तयार होणाऱ्या जातीची पेरणी करावी लागते.

दरम्यान या रब्बी हंगामात कमी पाऊस झाला असल्याने गव्हाच्या कमी पाण्यात तयार होणाऱ्या वाणाची लागवड करण्याचा सल्ला दिला जात आहे.

दरम्यान आता आपण गव्हाच्या अशाच एका सुधारित वाणाची माहिती जाणून घेणार आहोत. कमी पाण्यात काढण्यासाठी तयार होणाऱ्या गव्हाच्या सुधारित जातीची आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

गव्हाच्या सुधारित जाती कोणत्या ?

आज आपण कठीया गव्हाच्या जातीविषयी जाणून घेणार आहोत. गव्हाचा हा एक पारंपारिक वाण असून या जातीच्या गव्हाची बाजारात मोठी मागणी आहे. याला बाजारात योग्य भाव सुद्धा मिळतोय. हा वाण दुष्काळग्रस्त भागांमध्ये उपयुक्त ठरतो. या जातीचे पीक कमी पाण्यात तयार होते.

शिवाय हा वाण जास्तीचे तापमान सहन करतो. तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे या जातीचे पीक फक्त तीन पाणी भरले तरी देखील परिपक्व होते. तीन पाण्यातच या जातीच्या पिकातून चांगले उत्पादन मिळते. बागायती भागात या जातीपासून 50 ते 60 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळते.

मात्र कोरडवाहू भागात या जातीपासून 30 ते 35 क्विंटल एवढे उत्पादन सहजतेने मिळू शकते. सामान्य गव्हाच्या तुलनेत या जातीच्या गव्हात अधिक पोषक घटक असतात.

यामुळे या गव्हाचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. या जातीचा गहू कुपोषण कमी करण्यासाठी देखील महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. पिज्जा, शेवया, नूडल्स इत्यादी खाद्यपदार्थ बनवण्यासाठी या गव्हाचा वापर केला जातो.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा