गव्हाच्या ‘या’ 4 वाणाची पेरणी शेतकऱ्यांना बनवणार मालामाल ! हेक्टरी 75 क्विंटल पर्यंत मिळणार उत्पादन, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Wheat Farming : सध्या देशातील विविध राज्यांमध्ये हवामानात मोठा बदल पाहायला मिळत आहे. आपल्या राज्यातील हवामान देखील गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात बदलले आहे. राज्यातील विविध भागांमध्ये सध्या ढगाळ हवामान आहे. काही भागात पाऊस देखील सुरू आहे. अवकाळी पावसामुळे कोकणातील भात पिक संकटात आले आहे.

सध्या कोकणात भात पिकाची हार्वेस्टिंग सुरू आहे आणि अशातच त्या ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी लागत आहे. यामुळे भात पिकावर याचा मोठा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. भात पिकाला अवकाळी पावसाचा फटका बसणार आहे. दरम्यान भारतीय हवामान खात्याने येत्या काही दिवसांमध्ये अवकाळी पाऊस थांबेल आणि पुन्हा एकदा राज्यात थंडीला सुरुवात होईल असा अंदाज वर्तवला आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

यामुळे येत्या काही दिवसांमध्ये रब्बी हंगामातील पीक पेरणीला वेग येणार आहे. रब्बी मध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणात गहू या अन्नधान्य पिकाची पेरणी होण्याची शक्यता आहे. खरंतर यंदा मान्सून काळात अपेक्षित असा पाऊस बरसला नसल्याने काही प्रमाणात गहू लागवडीखालील क्षेत्र कमी होण्याची शक्यता आहे.

परंतु ज्या ठिकाणी पावसाची सोय आहे अशा भागात गहू पिकाची पेरणी होणार आहे. दरम्यान यावर्षी शेतकऱ्यांनी गव्हाच्या सुधारित वाणांची पेरणी केली पाहिजे असा सल्ला कृषी तज्ञांनी दिला आहे. यामुळे आज आपण गव्हाच्या उच्च उत्पादन देणाऱ्या जातींविषयी जाणून घेणार आहोत. आज आपण गव्हाच्या हेक्‍टरी 75 क्विंटल पर्यंत उत्पादन देऊ शकणाऱ्या काही सुधारित जाती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

गव्हाच्या सुधारित जाती कोणत्या

GW 322 : गव्हाचा हा एक सुधारित वाण आहे. देशातील प्रमुख गहू उत्पादक राज्यांमध्ये या जातीची मोठ्या प्रमाणात लागवड पाहायला मिळते. ही जात मध्य प्रदेश राज्यात मोठ्या प्रमाणात उत्पादीत केली जाते. हा वाण सुमारे 4 महिन्यांत परिपक्व होतो. म्हणजेच पेरणी केल्यानंतर सरासरी 120 दिवसात या जातीचे पीक परिपक्व बनते. GW 322 या जातीचे गव्हाचे उत्पादन भारतातील इतर राज्यांमध्येही घेता येते. ज्या ठिकाणी गव्हाची शेती होते त्या भागात गव्हाचा हा वाण पेरला जाऊ शकतो. या जातीला 3 ते 4 वेळा पाणी द्यावे लागते. ही एक गव्हाची उच्च उत्पादन देणारी जात आहे.

पुसा तेजस : जबलपूरच्या कृषी विद्यापीठाने गव्हाची ही सुधारित जात विकसित केली आहे. विद्यापीठाने घेतलेल्या चाचणीत या जातीपासून हेक्टरी ७० क्विंटल उत्पादन मिळाले होते. ही गव्हाची एक अलीकडेच विकसित झालेली प्रमुख आणि सुधारित जात आहे. पुसा तेजस हा गव्हाचा वाण शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय ठरला आहे. हा वाण 110-115 दिवसांत परिपक्व होत असल्याचा दावा केला जातो. या वाणाची विशेषता म्हणजे कमी पाण्यातही यापासून चांगले उत्पादन मिळू शकते. यामुळे यंदाच्या हंगामात या जातीची लागवड फायदेशीर ठरू शकते.

श्रीराम सुपर 111 : महाराष्ट्रासहित ज्या राज्यांमध्ये गव्हाची लागवड होते त्या ठिकाणी गव्हाचा हा वाण विशेष लोकप्रिय बनला आहे. शेतकऱ्यांमध्ये ही जात विशेष लोकप्रिय आहे. गव्हाचा हा वाण श्रीराम फर्टिलायझर्स अँड केमिकल्सच्या शास्त्रज्ञांनी विकसित केला आहे. श्रीराम 111 ही जात उशिरा पेरणीसाठी उपयुक्त असल्याचा दावा केला जातो.

साधारणतः 90 ते 100 दिवसात या जातीचे पीक परिपक्व होते. म्हणजेच अल्पकालावधीत या जातीपासून शेतकऱ्यांना उत्पादन मिळू शकते. या जातीचे दाणे चमकदार आहेत. या जातीपासून एकरी 22 ते 25 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळत आहे. तथापि उत्पादन हे जमिनीचा पोत, हवामान, पाण्याची उपलब्धता आणि शेतकऱ्यांच्या नियोजनावर अवलंबून राहणार आहे हे लक्षात ठेवावे.

HD 4728 : ज्या भागात गव्हाची लागवड होते त्या ठिकाणी गव्हाचा हा वाण पेरला जाऊ शकतो. या जातीचा गहू १२५-१३० दिवसांत परिपक्व होत असतो.  म्हणजेच चार ते सव्वाचार महिन्यांच्या काळात या जातीपासून शेतकऱ्यांना उत्पादन मिळते. याला पुसा मलावी या नावाने देखील शेतकरी बांधव ओळखतात.

या जातीपासून सरासरी ५५ क्विंटल प्रति हेक्टर एवढे उत्पादन शेतकऱ्यांना मिळत आहे. देशातील सर्वच राज्यांमध्ये या जातीची लागवड केली जाऊ शकते. या जातीच्या पिकासाठी तीन ते चार सिंचनाची गरज भासत असते. गव्हाची ही जात देखील शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय ठरली आहे.