शेतकऱ्यांनो, 15 नोव्हेंबर पर्यंत गव्हाच्या ‘या’ वाणाची पेरणी करा, एकरी 30 क्विंटल पर्यंतचा उतारा मिळणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Wheat Farming : महाराष्ट्रात सर्वत्र रब्बी हंगामाला सुरुवात झाली आहे. खरीप हंगामातील पिकांची हार्वेस्टिंग पूर्ण झाली असून आता शेतकरी रब्बी हंगामाकडे वळला आहे. रब्बी हंगामातील पीक पेरणीसाठी सध्या जमिनीच्या पूर्व मशागती केल्या जात आहेत. काही भागात तर रब्बी पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रब्बी हंगामात गव्हाची मोठ्या प्रमाणात पेरणी होण्याची शक्यता आहे. यंदा पाऊसमान कमी असल्याने काही भागात गहू लागवडीखालील क्षेत्र घटणार आहे पण ज्या ठिकाणी पुरेसा पाऊस आहे अशा भागात गव्हाची मोठ्या प्रमाणात लागवड होईल असा अंदाज आहे.

तथापि, गव्हाच्या पिकातून चांगले विक्रमी उत्पादन मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना गव्हाच्या सुधारित आणि चांगल्या उत्पादन देणाऱ्या दर्जेदार वाहनांची निवड करावी लागणार आहे. जर गव्हाच्या सुधारित वाणांची निवड केली तर शेतकऱ्यांना चांगले विक्रमी उत्पादन मिळणार आहे. यामुळे आज आपण गव्हाच्या अशा वाणाविषयी जाणून घेणार आहोत ज्यापासून शेतकऱ्यांना एकरी 30 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळू शकते.

अर्थातच एकरी उतारा हा पाण्याची उपलब्धता, जमिनीचा पोत आणि शेतकऱ्यांचे नियोजन यावर अवलंबून राहणार आहे. जर शेतकऱ्यांनी चांगल्या सुधारित वाणांची निवड केली तर निश्चितच योग्य नियोजनाने शेतकऱ्यांना विक्रमी उत्पादन या ठिकाणी मिळवता येऊ शकते. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया गव्हाच्या सुधारित जाती.

अंकुर केदार : तुम्हाला गव्हाचे विक्रमी उत्पादन मिळवायचे असेल तर तुम्ही गव्हाच्या या वाणाची निवड करू शकता. विशेष म्हणजे या जातीचा गहू हा खाण्यासाठी उत्कृष्ट आहे. म्हणजे या जातीचा गहू हा चपातीसाठी उत्कृष्ट असतो. या जातीपासून एकरी 25 ते 26 क्विंटल एवढे अवरेज उत्पादन मिळत असल्याचे महत्त्व शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे. काही शेतकऱ्यांना तर याहीपेक्षा अधिकचे उत्पादन मिळत आहे.

परंतु उत्पादनाचा हा आकडा सर्वस्वी जमिनीचा पोत, पाण्याची उपलब्धता, हवामान आणि शेतकऱ्यांचे नियोजन यावर आधारित आहे. हा वाण उच्च उत्पादनासाठी विशेष ओळखला जातो. हे जरी खरे असले तरी देखील या जातीच्या पीकाच्या हार्वेस्टिंगला जर उशीर झाला तर मोठ्या प्रमाणात ओंब्या फुटतात. त्यामुळे योग्य वेळी पिकाची हार्वेस्टिंग करणे आवश्यक आहे.

अजित 102 : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये हा वाण खूपच लोकप्रिय आहे. उच्च उत्पादनासाठी ही जात विशेष ओळखली जाते. ज्या शेतकऱ्यांना व्यावसायिक स्तरावर गव्हाची लागवड करायची आहे, म्हणजे फक्त विक्रीसाठी गव्हाचे उत्पादन घेतात अशा शेतकऱ्यांनी या वाणाची निवड केली पाहिजे.

या जातीपासून एकरी 28 ते 29 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळत असल्याचा दावा शेतकऱ्यांच्या माध्यमातून केला जात आहे. काही शेतकऱ्यांनी तर एकरी 30 क्विंटल पर्यंत या वाणापासून उतारा मिळवला असल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे यादेखील जातीचा गहू हा चपातीसाठी चांगला आहे.

लोकवण : यंदाची दुष्काळी परिस्थिती पाहता गव्हाचा हा वाण शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकतो. गव्हाचा हा वाण कमी पाण्यात चांगलं उत्पादन देतो. सरासरी 120 ते 130 दिवसात या जातीचे पीक परिपक्व होते. कमी पाणी असले तरीदेखील सरासरी 15 क्विंटल पर्यंतचे एकरी उत्पन्न या जातीपासून मिळू शकते. चांगले पाणी असेल तर शेतकरी बांधव 18 क्विंटल पर्यंतचे उत्पादन या जातीपासून घेऊ शकतात.

विशेष म्हणजे या जातीचा गहू हा पुरणपोळी बनवण्यासाठी वापरला जातो. यामुळे जर तुम्ही घरगुती वापरासाठी किंवा स्थानिक पातळीवर विक्रीसाठी गव्हाची लागवड करत असाल तर हा वाण तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. पुरणपोळीसाठी या जातीचा गहू उत्कृष्ट असल्याने बाजारात या जातीच्या गव्हाला चांगला दरही मिळतो.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा