गव्हाची पेरणी करणार आहात ? मग ‘या’ जातीच्या गव्हाची पेरणी करा, मिळणार सर्वाधिक उत्पादन, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Wheat Farming : येत्या काही दिवसात देशात रब्बी हंगामाला सुरुवात होणार आहे. या रब्बी हंगामात गव्हाची मोठ्या प्रमाणात पेरणी होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही या रब्बी हंगामात गव्हाची पेरणी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी ही एक महत्त्वाची बातमी राहणार आहे.

कारण की, आज आपण गव्हाच्या एका सुधारित जातीची माहिती जाणून घेणार आहोत. खरंतर गहू रब्बी हंगामात उत्पादित होणारे एक प्रमुख अन्नधान्य पीक आहे. गव्हाची लागवड आपल्या राज्यातही मोठ्या प्रमाणात केली जाते. राज्यातील विविध भागात गहू पीक उत्पादीत केले जात आहे. वास्तविक गव्हाची शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरतेच.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

मात्र, गव्हाच्या पिकातून जर चांगले अधिकचे उत्पादन मिळवायचे असेल तर या पिकाच्या सुधारित वाहनांची पेरणी करणे अतिशय आवश्यक ठरते. गव्हाची पेरणी नोव्हेंबर महिन्यात केली जाते. एक नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान गव्हाची वेळेवर पेरणी होते. 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर पर्यंत गव्हाची उशिरा पेरणी केली जाते.

पण कृषी तज्ञ शेतकऱ्यांना गव्हाची वेळेवर पेरणी करण्याचा सल्ला देतात. गव्हाची जर वेळेवर करणे केले तर चांगले उत्पादन मिळत असल्याचा दावा केला जातो. अशा परिस्थितीत येत्या काही दिवसात गव्हाच्या पेरणीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे आज आपण गव्हाच्या श्रीराम सुपर 272 या वाणाविषयी जाणून घेणार आहोत.

श्रीराम सुपर 272 च्या विशेषता

भारतात उत्पादित होणारी गव्हाची एक प्रमुख जात आहे. या जातीची लागवड विविध राज्यांमध्ये पाहायला मिळते. या जातीची पेरणी आगात म्हणजे लवकर आणि उशिराने देखील केली जाऊ शकते. मात्र वेळेवर पेरणी केली तरच या जातीपासून चांगले उत्पादन मिळते.

परंतु या जातीची पेरणी डिसेंबर पर्यंत केली जाऊ शकते. या जातीचे पीक सरासरी 140 ते 150 दिवसात परिपक्व बनते. या जातीच्या पिकाची उंची 100 सेंटीमीटर पर्यंत वाढते. पेरणीसाठी एकरी 40 किलोग्रॅम पर्यंत बियाणे वापरण्याचा सल्ला दिला जातो.

जर उशिराने या जातीची लागवड करायची असेल तर पेरणीसाठी एकरी 50 किलोग्रॅम पर्यंत बियाणे वापरण्याचा सल्ला दिला जातो. या जातीच्या गहू पिकासाठी जवळपास चार ते पाचदा सिंचन करावे लागते. या जातीची हलक्या भारी आणि मध्यम जमिनीत पेरणी केली जाऊ शकते. या जातीपासून सरासरी 25 क्विंटल प्रति एकर पर्यंतचे उत्पादन मिळते.