Wheat Farming : गहू पेरणीचा मुहूर्त आला रे….! महाराष्ट्रात उत्पादित केल्या जाणाऱ्या ‘या’ जातींची गव्हाची पेरणी करा, लाखों कमवा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Wheat Farming : मित्रांनो सध्या खरीप हंगाम (Kharif Season) प्रगतीपथावर असून आगामी काही दिवसात रब्बी हंगामाला (Rabi Season) सुरुवात होणार आहे. संपूर्ण भारत वर्षात रब्बी हंगामात वेगवेगळ्या पिकांची शेती शेतकरी बांधव (Farmer) करत असतात. रब्बी हंगामात गहू या पिकाची देखील मोठ्या प्रमाणात पेरणी केली जाते. आपल्या राज्यातील गहू लागवडीखालील क्षेत्र देखील विशेष उल्लेखनीय आहे.

राज्यातील शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात गव्हाची लागवड करतात आणि चांगले उत्पन्न (Farmer Income) देखील कमवतात. जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकरी बांधवांना गव्हाच्या शेतीतून निश्चितच अधिक उत्पन्न मिळणार आहे मात्र यासाठी शेतकरी बांधवांनी काही गोष्टींची काळजी घेणे अतिशय आवश्यक राहणार आहे. जाणकार लोकांच्या मते शेतकरी बांधवांनी जर गव्हाच्या सुधारित वाणांची (Wheat Variety) पेरणी केली तर निश्‍चितच त्यांना गव्हाच्या शेतीतून अधिक उत्पादन मिळणार आहे.

शिवाय सुधारित जातीच्या वाणाची पेरणी केल्यास गहू पिकावर कमी प्रमाणात रोगाचे सावट पाहायला मिळते यामुळे उत्पादन खर्चात देखील बचत होते. अशा परिस्थितीत आज आम्ही आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी महाराष्ट्रात उत्पादित केल्या जाणाऱ्या काही निवडक सुधारित जातींची माहिती घेऊन हजर झालो आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया महाराष्ट्रात उत्पादित केल्या जाणाऱ्या गव्हाच्या काही सुधारित जाती.

गव्हाच्या सुधारित जाती नेमक्या कोणत्या बर…!

AKW 4647 :- गव्हाची ही एक सुधारित जात आहे. ही जात डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी 2012 मध्ये विकसित केली आहे. या पिकाच्या गव्हाची उंची 78 सेंटीमीटर पर्यंत असते. या गव्हाची वाढ सरळ होते शिवाय याला दोन ते तीन फूट हे देखील असतात. ओंबी देखील न झडणारी असते. जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार ही जात तांबेरा आणि करपा रोगास प्रतिकारक आहे. या जातीचे दाणे अंडाकार मध्यम आकाराचे असतात. ही जात पेरणी केल्यानंतर 95 ते 100 दिवसात उत्पादन देण्यास तयार होते. गव्हाची ही जात हेक्‍टरी 40 क्विंटलपर्यंत उत्पादन देण्यात सक्षम असते.

एमएसीएस 6478 :- गव्हाची ही एक सुधारित जात असून ही जात 2014 मध्ये विकसित करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील शेतकरी बांधव या जातीच्या गव्हाची मोठ्या प्रमाणात पेरणी करत असतात. या जातीच्या गव्हाची उंची मध्यम असते. गव्हाचे दाणे चमकदार असतात. पेरणीनंतर 100 ते 110 दिवसांत उत्पादन देण्यास तयार होते. हेक्टरी 45 ते 48 क्विंटलपर्यंत उत्पादन देण्यास सक्षम आहे.

एमएसीएस 6222 :- हि जात 2010 मध्ये विकसित झाली आहे. या जातीची महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पेरणी केली जाते. या जातीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे वर नमूद केलेल्या दोन्ही जातींपेक्षा या जातीच्या गव्हाचे उत्पादन अधिक असते. या जातीच्या गव्हापासून 47 ते 50 क्विंटलपर्यंत उत्पादन घेता येते. या जातीचा गहू 102 ते 106 दिवसात काढणीसाठी तयार होतो.

फुले समाधान :- ही जात महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी 2014 मध्ये विकसित झाली आहे. ही जात 95 ते 102 दिवसात काढण्यासाठी तयार होत असते. या जातीचा गहू 44 ते 48 क्विंटलपर्यंत उत्पादन देण्यास सक्षम असतो.

पीडीकेव्ही सरदार :- डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी पीडीकेव्‍ही सरदार ही जात विकसित केली आहे. ही जात पेरणी केल्यापासून 90 ते 100 दिवसात काढणीसाठी तयार होते आणि या जातीच्या गव्हाच्या पिठापासून हेक्टरी 40 ते 42 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment