Wheat Farming : गहू पेरणीची घटका आली समीप..! राहुरी कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या ‘या’ गव्हाच्या सुधारित जातीची पेरणी करा, लाखों कमवा 

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Wheat Farming : भारतात रब्बी हंगाम (Rabi Season) आगामी काही दिवसात सुरू होणार आहे. मित्रांनो भारतात रब्बी हंगामात गव्हाची लागवड (Wheat Cultivation) मोठ्या प्रमाणात केली जाते. आपल्या राज्यात देखील गव्हाची शेती विशेष उल्लेखनीय आहे.

सध्या आपल्या राज्यातील शेतकरी बांधव (Farmer) खरीप हंगामातील पिकांचे पीक व्यवस्थापन (Crop Management) करण्यात व्यस्त असून आगामी रब्बी हंगामासाठी खतांची तसेच बियाणांची पूर्तता करताना बघायला मिळत आहे.

अशा परिस्थितीत बहुतांशी शेतकरी बांधव गहूचे बियाणे देखील खरेदी करत आहेत. जाणकार लोकांच्या मते, जर शेतकरी बांधवांनी गव्हाच्या सुधारित जातीच्या (Wheat Variety) बियाणांची पेरणी केली तर शेतकऱ्यांना गव्हाच्या शेतीतून अधिक उत्पादन मिळणार आहे परिणामी शेतकऱ्यांचे उत्पन्न (Farmer Income) विशेष वाढणार आहे.

अशा परिस्थितीत आज आपण आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी गव्हाच्या  एका सुधारित जातींची माहिती घेऊन हजर झालो आहोत. मित्रांनो खरे पाहता महाराष्ट्रात जिरायती तसेच बागायती दोन्ही भागात गव्हाची लागवड केली जाते. आज आपण देखील अशा एका जातीची माहिती जाणून घेणार आहोत ज्या जातीची जिरायती तसेच बागायती दोन्ही भागात लागवड केली जाऊ शकते.

गव्हाच्या या वाणाची कोरडवाहू भागात लागवड केली आणि एक ओलिताखालील पाणी भरले तरी देखील गव्हाच्या या जाती मधून चांगले उत्पादन शेतकऱ्यांना मिळणार आहे. मित्रांनो आम्ही ज्या गव्हाच्या जाती बद्दल बोलत आहोत ती गव्हाची जात आहे नेत्रावती. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की 2011 मध्ये गव्हाची नेत्रावती ही जात संशोधकांनी विकसित केली आहे.

महाराष्ट्रातील महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत निफाड गहू संशोधन केंद्रातर्फे नेत्रावती ही जात प्रसारित करण्यात आली आहे. हे वाण कोरडवाहू भागासाठी अनुकूल वाण असल्याचे जाणकार लोक नमूद करतात.

नेत्रावती जातीची वैशिष्ट्ये जाणून तर घ्या 

जाणकार लोकांनी दावा केला आहे की या जातीच्या गव्हाला ओलिताखालील एका पाण्याची जरी सोय असली तरी त्याची लागवड शक्य आहे.

नेत्रावती गव्हाची लागवड कोरडवाहू क्षेत्रात केल्यास हेक्टरी 18 ते 20 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळू शकते. तसेच मर्यादित सिंचन असल्यास 25 ते 30 क्विंटल उत्पादन या जातीच्या गहूपासून घेतले जाऊ शकते असा दावा केला जातो.

जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, या जातीच्या गव्हाचे वाण उत्तम आहे, गव्हाचे दाणे मध्यम व आकर्षक असतात. तसेच यामध्ये प्रथिनांचे प्रमाण 12 टक्के असते.

या जातीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे गहू पिकावर सर्वाधिक आढळणारा तांबेरा रोगास हा प्रतिकारक आहे. चपाती बनवण्यासाठी या जातीचा गहू उत्कृष्ट असल्याचा दावा देखील केला गेला आहे.

जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, जिराईत पेरणीसाठी पंचवटी (एनआयडीडब्लू-15), शरद (एनआयएडब्लू-2997-16) व मर्यादित सिंचनाची व्यवस्था असल्यास नेत्रावती (एनआयएडब्लू-1415) या वाणांची निवड करावी.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment