कमालच ! गव्हाचे नवीन वाण तयार, फक्त 10 आठवड्यात तयार होणार पीक, एकरी 100 क्विंटलचे उत्पादन, कुठं विकसित झाले नवीन वाण ? वाचा….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Wheat Farming : गहू हे भारतात पिकवले जाणारे एक मुख्य पीक आहे. विशेष म्हणजे गव्हाची खपत देखील आपल्याच देशात सर्वाधिक आहे. हे असे धान्य आहे जे अनेक गोष्टींमध्ये वापरले जाते. यापासून पोळी, ब्रेड, बिस्कीट, मैदा, इत्यादी गोष्टी गव्हापासून तयार केल्या जातात. गव्हाचा वापर भारतात सर्वाधिक होतो, शिवाय आफ्रिका मध्ये देखील गहू मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो.

हेच कारण आहे की, संपूर्ण जग गव्हाच्या जास्तीत जास्त उत्पादनावर भर देत आहे.रशिया-युक्रेन युद्ध सुरु झाले तेव्हा रशिया-युक्रेनमधून गव्हाची निर्यात थांबली होती. यामुळे युद्धाच्या सुरुवातीच्या टप्प्यात आफ्रिकन देशांमध्ये अन्नाचे संकट तयार झाले होते.

आफ्रिका समवेतच अनेक युरोपियन देशांमध्ये देखील अन्न संकट निर्माण झाले होते. आपल्या देशाला या युद्धाचा फारसा फटका बसला नाही. आपल्या देशात मोठ्या प्रमाणात गव्हाचा स्टॉक उपलब्ध असल्याने या युद्धामुळे आपल्या देशात गव्हाचा शॉटेज निर्माण झाला नाही.

मात्र असे असले तरी गव्हाच्या किमती थोड्या वाढल्या आहेत. तर दुसरीकडे वाढती लोकसंख्या पाहता आगामी काळात अन्न संकट आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.आफ्रिकन देशांमध्ये तर आताच अन्नसंकट पाहायाला मिळत आहे.

गरीब देशांमध्ये उपासमारीमुळे आणि कुपोषणामुळे मोठ्या प्रमाणात महिलांची आणि बालकांची जीवित हानी होऊ लागली आहे. यामुळे गरीब देशांमधील उपासमारीचे हे संकट कमी करण्यासाठी आणि संपूर्ण जगाचे पोट भरावे यासाठी अन्नधान्य उत्पादन वाढवण्यासाठी आता जगभरातील शास्त्रज्ञांच्या माध्यमातून सामूहिक प्रयत्न केले जाऊ लागले आहेत.

याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून गव्हाचे उत्पादन वाढवण्यासाठी देखील गव्हाची नवीन जात विकसित करण्याचा शास्त्रज्ञांचा अट्टहास आहे. खरेतर सध्या आपल्या देशात गव्हाची एकदाच पेरणी केली जात आहे. आपल्या देशात फक्त हिवाळ्यात म्हणजेच रब्बी हंगामात गव्हाची पेरणी होते. याचे पीक जवळपास ४ महिन्यांनी तयार होते.

गव्हाच्या काही लवकर तयार होणाऱ्या जाती 110 दिवसांमध्ये परिपक्व होतात. तर काही उशिरा परिपक्व होणाऱ्या जाती 120 दिवसांपेक्षा अधिक काळ घेतात. हे पिक वर्षातून एकदाच घेता येते. मात्र आता जर्मन शास्त्रज्ञ अशा प्रकारचे गव्हाचे वाण वाढवत आहेत, ज्याची कापणी वर्षातून 6 वेळा केली जाऊ शकते.

यामुळे शेतकऱ्यांना बंपर उत्पन्न मिळणार आहे. मीडिया रिपोर्ट नुसार, जर्मनीतील म्युनिक शहरातील संशोधक क्लायमेंट चेंबरमध्ये गव्हाच्या शेतीत काही प्रयोग करत आहेत. त्यांनी गव्हाचा असा एक विशेष वाण तयार केला आहे, जो की फार लवकर परिपक्व होतो. हा नवीन वाण वर्षातून सहा वेळा उत्पादन देणार आहे.

शास्त्रज्ञांच्या मते, गव्हाची ही विशेष जात 10 आठवड्यांपूर्वी म्हणजेच अडीच महिन्यांपूर्वी तयार होणार आहे. तसेच हा नवखा वाण अधिक प्रकाशात जास्त उत्पादन देण्यास सक्षम राहणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. यामुळे हा नवीन वाण भारतासारख्या देशातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरू शकतो असा आशावाद व्यक्त होत आहे.

या वाणातून तुम्हाला एका वेळेच्या खर्चात 6 पट उत्पादन मिळवता येणार आहे. म्हणजेच सध्या एका एकरात 20 क्विंटल गव्हाचे उत्पादन मिळतंय त्याच जमिनीवर आता 100 क्विंटल गव्हाचे उत्पादन मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना अधिकचे उत्पादन मिळवता येणार आहे. 

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा