Wheat Farming : देशभरातील गहू उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. खरे तर गहू हे भारतात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे अन्नधान्य पीक आहे. याची लागवड देशभरातील अनेक राज्यांमध्ये केली जाते. आपल्या महाराष्ट्रात देखील गहू लागवडीखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे. राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील प्रमुख बागायती भागांमध्ये याची लागवड केली जाते.
गव्हाची लागवड ही रब्बी हंगामात होत असते. हे रब्बी हंगामातील एक महत्त्वाचे पीक असून या पिकाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक मोठी गुड न्यूज समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय कृषी संशोधन संस्था (RARI-Pusa) दिल्लीने गव्हाची नवीन जात शोधली आहे, जी समितीच्या माध्यमातून अधिसूचित करण्यात आली आहे.
अर्थातच या नव्याने विकसित झालेल्या जातीचे बियाणे शेतकऱ्यांना लवकरच उपलब्ध होणार आहे. असे म्हटले जात आहे की यंदा अर्थातच येत्या रब्बी हंगामामध्ये हे नवीन बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहेत. यामुळे, गहू उत्पादक शेतकऱ्यांना या नव्याने विकसित जातीची पेरणी करून चांगले दर्जेदार उत्पादन मिळवता येईल अशी आशा व्यक्त होत आहे.
कृषी संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार गव्हाचे हे नव्याने विकसित झालेले वाण विषाणूविरोधी असेल आणि यातून बंपर उत्पादन मिळू शकणार आहे. विशेष म्हणजे या नव्याने विकसित जातीचे बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी काही कंपन्यांशी ओएमयू साईन केला जात आहे.
म्हणजेच शेतकऱ्यांना या जातीचे बियाणे उपलब्ध व्हावे यासाठी करार केला जात आहे. यामुळे या जातीचे बियाणे लवकरच शेतकऱ्यांना मिळणार असे स्पष्ट होत आहे. भारतीय कृषी संशोधन संस्था पुसा दिल्लीने जें नवीन बियाणे विकसित केले आहे त्याला एचडी 3386 असे नाव देण्यात आले आहे.
ही जात उत्तर-पश्चिम मैदानी प्रदेशात सिंचनासाठी आणि वेळेवर पेरणीसाठी चांगली राहणार आहे. सुरुवातीला हे बियाणे गहू उत्पादक शेतकऱ्यांना पुसा इन्स्टिट्यूट, दिल्ली येथून मिळणार आहे. ऑक्टोबर 2024 पासून पुसा इन्स्टिट्यूट दिल्ली येथे हे बियाणे मिळेल. याशिवाय काही निवडक विक्रेत्यांशी सामंजस्य करार करण्यात येणार आहेत.
जेणेकरून शेतकऱ्यांना हे बियाणे तिथेच मिळू शकेल. एमओयूची प्रक्रियाही लवकरच सुरू होईल आणि विक्रेत्यांची यादीही प्रसिद्ध केली जाईल, जेणेकरून शेतकरी त्यांच्या जवळच्या विक्रेत्यांकडून बियाणे खरेदी करू शकतील, अशी माहिती प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे.