शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ; पाणी कमी असेल तर गव्हाला केव्हा आणि किती पाणी दिले पाहिजे ? वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Wheat Farming : यंदा जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात महाराष्ट्रात खूपच कमी पाऊस झाला आहे. याचा परिणाम म्हणून खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनात मोठी घट आली आहे. सोबतच कमी पावसामुळे रब्बी हंगाम देखील प्रभावित होण्याची दाट शक्यता आहे.

रब्बी हंगामातील गहू, हरभरा यांसारख्या मुख्य पिकांच्या उत्पादनात यंदा घट राहील असा अंदाज आहे. खरे तर गहू हे रब्बी हंगामात उत्पादित केले जाणारे एक महत्त्वाचे पीक आहे.

याची लागवड आपल्या राज्यातील बहुतांशी भागात पाहायला मिळते. अनेक शेतकऱ्यांचे यावर अर्थकारण अवलंबून आहे. पण यावर्षी कमी पावसामुळे गहू पिकासाठी पाण्याचे व्यवस्थापन करताना विशेष काळजी घेणे अपेक्षित आहे.

यामुळे जर तुम्हीही यंदा गव्हाची लागवड केलेली असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी कमी पाणी असेल तर यंदा गव्हाला केव्हा आणि किती पाणी दिले पाहिजे याबाबत महत्त्वाची अशी माहिती घेऊन आलो आहोत.

केव्हा आणि किती पाणी द्यावे

यंदा कमी पाणी असतानाही जर गव्हाच्या पिकातून समाधानकारक उत्पादन मिळवायचे असेल तर योग्य पाणी व्यवस्थापन करावे लागेल. गव्हाच्या पिकाला योग्य वेळी पाणी दिले तर पिकातून बऱ्यापैकी उत्पादन मिळू शकते.

कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार जर गहू पिकासाठी एक पाणी देण्याएवढेच पाणी शेतकऱ्यांकडे असेल तर त्यांनी गव्हाची पेरणी झाल्यानंतर साधारणता 40 ते 42 दिवसांनी पाणी दिले पाहिजे.

मात्र ज्या शेतकऱ्यांकडे पिकाला दोन पाणी देता येईल एवढे पाणी असेल त्यांनी पहिले पाणी पेरणीनंतर 20 ते 22 दिवसांनी आणि दुसरे पाणी पेरणीनंतर 60 ते 65 दिवसांनी दिले पाहिजे जेणेकरून त्यांना बऱ्यापैकी उत्पादन या ठिकाणी मिळू शकेल.

याशिवाय ज्या शेतकऱ्यांकडे गव्हाच्या पिकासाठी तीन पाणी देता येईल एवढे पाणी उपलब्ध असेल त्यांनी पहिले पाणी 20 ते 22 दिवसांनी द्यावे दुसरे पाणी 40 ते 42 दिवसांनी द्यावे आणि तिसरे पाणी 60 ते 65 दिवसांनी द्यावे असा सल्ला कृषी तज्ञांनी यावेळी दिला आहे.

कमी पाणी मिळाले तर उत्पादनात येणार मोठी घट

कृषी तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे गहू हे एक प्रमुख बागायती पीक आहे. या पिकातून चांगले उत्पादन मिळवण्यासाठी याला अधिकचे पाणी लागते. जर कमी पाणी दिले तर उत्पादनात मोठी घट येते. जर समजा एखाद्या शेतकऱ्याने गव्हाच्या पिकाला एकच पाणी दिले तर उत्पादनात जवळपास 41 टक्क्यांपर्यंत घट येऊ शकते असा अंदाज तज्ञांनी वर्तवला आहे.

मात्र ज्या शेतकऱ्यांनी दोन पाणी दिले असेल त्या शेतकऱ्यांच्या पीक उत्पादनात 20 ते 22% पर्यंतची घट घेऊ शकते. तथापि जर शेतकऱ्यांकडे कमी पाणी असेल तर त्यांनी ठिबक सिंचन प्रणालीचा वापर करावा असा सल्ला देखील तज्ञांनी दिला आहे. 

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा