Wheat Farming : सध्या देशात रब्बी हंगाम सुरू आहे. आपल्या देशात रब्बी हंगामामध्ये विविध पिकांची शेती केली जाते. यामध्ये गहू पिकाचा देखील समावेश होतो. गव्हासोबतच हरभऱ्याचे देखील आपल्या देशात मोठ्या प्रमाणात उत्पादन होते.
तथापि गव्हाची खपत आणि गहू उत्पादन आपल्या देशात सर्वात जास्त आहे. गहू लागवडीखालील क्षेत्र सर्वाधिक पाहायला मिळते.
याच्या लागवडीचा विचार केला असता महाराष्ट्रात देखील गव्हाचे लागवडीखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे. मात्र देशातील पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यात गव्हाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते.
येथील लागवडीखालील क्षेत्र हे आपल्या राज्यापेक्षा अधिक आहे. पण, राज्यातील बागायती भागात हरभरा आणि गहू लागवड मोठ्या प्रमाणात होते.
अशा परिस्थितीत आज आपण गव्हाच्या पिकातून विक्रमी उत्पादन मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी काय उपाययोजना केल्या पाहिजेत याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
खरेतर गव्हाच्या उत्पादनात झिंकच्या कमतरतेमुळे मोठ्या प्रमाणात घट येण्याची भीती असते. यामुळे झिंकची कमतरता दूर करणे आवश्यक असते. कारण की झिंकच्या कमतरतेमुळे पिकाची योग्य वाढ होत नाही. पिकाची पाने पिवळी पडतात आणि वाढ खुंटते.
त्याचा परिणाम म्हणून उत्पादनात मोठी घट येऊ शकते. परिणामी कृषी तज्ञांनी झिंकची कमतरता दूर करण्यासाठी कोणत्या खताचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे याविषयी आता आपण जाणून घेणार आहोत.
झिंकची कमतरता दूर करण्यासाठी काय कराल ?
जर गव्हाच्या पिकात झिंकची कमतरता जाणवत असेल तर शेतकऱ्यांनी झिंक सल्फेटचा वापर करायला हवा. जर तुमच्याही पिकात झिंकची कमतरता असेल तर तुम्ही झिंक सल्फेट ३३ टक्के ६ किलो प्रति एकर या प्रमाणात फवारणी करू शकतात.
किंवा झिंक सल्फेट २१ टक्के युरियासह १० किलो प्रति एकर या प्रमाणात शेतात टाकता येते. त्यामुळे गव्हाचे उत्पादन चांगले येते.
झिंकची कमतरता दूर केली तर गव्हाच्या पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन मिळवता येऊ शकते. तथापि झिंकची कमतरता झाल्यास सर्वप्रथम कृषी तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक राहणार आहे.