Wheat Farming : गहू हे रब्बी हंगामात उत्पादित होणारे एक मुख्य पीक आहे. या पिकाची महाराष्ट्रासह संपूर्ण देशात पेरणी केली जाते. या रब्बी हंगामातील पिकाची 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत पेरणी होते. मात्र काही शेतकऱ्यांना गव्हाची वेळेवर पेरणी करता येणे शक्य होत नाही.
मग असे शेतकरी बांधव उशिराने देखील गव्हाची पेरणी करतात. पण गव्हाची उशिराने पेरणी केली तर उत्पादनात मात्र घट येण्याची भीती असते.
तथापि गव्हाची उशिराने पेरणी 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीमध्ये पूर्ण होते. मात्र काही राज्यात याहीपेक्षा उशिराने गव्हाची पेरणी होते.
काही ठिकाणी तर डिसेंबरच्या अखेरपर्यंत आणि जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत गव्हाची पेरणी केली जाते.
मात्र गव्हाची उशिराने पेरणी म्हणजे उत्पादनात मोठी घट हे एक समीकरणच आहे.यामुळे गव्हाची नेहमी वेळेवर पेरणी केली पाहिजे असा सल्ला कृषी तज्ञांनी दिला आहे.
परंतु ज्या शेतकऱ्यांनी गव्हाची उशिराने पेरणी केलेली असेल त्यांनी चांगले उत्पादन मिळवण्यासाठी आणि उत्पादनात येणारे मोठी घट कमी करण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत याविषयी आता आपण थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
गव्हाची पेरणी उशिरा झाल्यास उत्पादनावर परिणाम होऊ शकतो, कारण थंडीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. उशीरा पेरणी केल्यास गहू पिकावर दंवचा जास्त परिणाम होतो.
हे पाहता शेतकऱ्यांनी काही उपाययोजना कराव्यात, जेणेकरून पीक नुकसानीपासून वाचवता येईल, असे कृषी शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
उशिरा पेरणी केलेले गहू पीक 21-25 दिवसांचे असल्यास आवश्यकतेनुसार पहिले पाणी द्यावे व उर्वरित नत्राची 3-4 दिवसांनी फवारणी करावी, असे कृषी शास्त्रज्ञ सांगतात.
गहू पिकावर वाळवीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास संरक्षणासाठी शेतकऱ्यांनी क्लोरपायरीफोसिन २० ईसी @ 2.0 लिटर 20 किलो वाळू प्रती एकर या प्रमाणात मिसळून पिकांमध्ये शिंपडावे. यामुळे पिकाचे दंवपासून संरक्षण होईल.