गव्हाच्या पिकाला किती दिवसांनी पाणी दिले पाहिजे? तज्ञांनी दिली मोठी माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Wheat Farming : गहू हे राज्यासह देशातील विविध राज्यांमध्ये उत्पादित होणारे एक प्रमुख अन्नधान्य पीक आहे. या पिकाची राज्यातील विविध भागामध्ये मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. यावर्षी मात्र कमी पावसामुळे राज्यातील बहुतांशी भागांमध्ये गव्हाच्या लागवडी खालील क्षेत्रात घट होणारा असा अंदाज आहे.

ज्या ठिकाणी पुरेसा पाऊस होता अशा भागात मात्र गहू पेरणी पूर्ण करण्यात आली आहे. खरे तर, गव्हाच्या पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन मिळवण्यासाठी गव्हाच्या सुधारित वाणांची पेरणी करण्याचा सल्ला दिला जातो.

सोबतच पिकातील पाण्याचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने करणे देखील आवश्यक आहे. पिकाला योग्य पद्धतीने पाणी दिले नाही तर पिकाची वाढ खुंटते आणि अपेक्षित असे उत्पादन मिळत नाही.

कृषी तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार गव्हाच्या पिकासाठी अतिशय हलकी मुरमाड आणि खूप भारी जमीन योग्य नसते. म्हणजे हलक्या, मध्यम ते भारी जमिनीत गव्हाचे पीक चांगले येते.

दरम्यान आता आपण गव्हाच्या पिकासाठी पाणी व्यवस्थापन कसे केले पाहिजे, गव्हाच्या पिकाला किती दिवसांनी पाणी दिले तर चांगले उत्पादन मिळते याबाबत कृषी तज्ञांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण माहिती विषयी जाणून घेणार आहोत.

गव्हाच्या पिकासाठी कसे करावे पाणी व्यवस्थापन?

कृषी तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे मध्यम ते भारी जमिनीत गव्हाची लागवड केलेली असल्यास 21 दिवसांच्या अंतराने एकूण पाच पाण्याच्या पाळ्या दिल्या पाहिजेत.

पेरणीच्या वेळी, मुकुट मुळे फुटण्याच्या वेळी, कांडी धरणे, फुलोरा व चीक भरणे आणि दाणे भरण्याच्या अवस्थेत पाणी दिले पाहिजे. जर समजा गव्हाच्या पिकासाठी एकच पाणी देणे शक्य असेल तर पेरणीनंतर 40 ते 42 दिवसांनी पाणी देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. प

ण जर शेतकऱ्यांकडे गव्हाच्या पिकासाठी दोन पाणी देण्याइतके पाणी असेल तर शेतकऱ्यांनी पेरणीनंतर 40 ते 42 दिवसांनी आणि 60 ते 65 दिवसांनी पाणी दिले पाहिजे असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.

तसेच हलक्या जमिनीत गव्हाची लागवड केलेली असेल तर शेतकऱ्यांनी पिकाला 15 ते 20 दिवसांनी पाणी दिले पाहिजे.

हलक्या जमिनीत लागवड केलेल्या गव्हाच्या पिकाला 15 ते 20 दिवसांच्या अंतराने कमी प्रमाणात (चार ते पाच सेंटीमीटर उंचीचे) पाणी दिले पाहिजे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा