गव्हाच्या पिकासाठी सल्फरचा वापर केव्हा केला पाहिजे ? कृषी तज्ञांनी दिली मोठी माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Wheat Farming : जर तुम्हीही यंदाच्या रब्बी हंगामात गव्हाची पेरणी केली असेल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खास करणार आहे. खरे तर यंदा मान्सून काळात पुरेसा पाऊस झाला नसल्याने रब्बी हंगामातील गहू लागवडी खालील क्षेत्र थोड्याफार प्रमाणात कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

तथापि ज्या शेतकऱ्यांकडे शास्वत पाण्याची उपलब्धता आहे आणि ज्या भागात मान्सून काळात बऱ्यापैकी पाऊस झाला आहे अशा ठिकाणी यंदा गव्हाची पेरणी होणारच आहे.

दरम्यान आज आपण गहू उत्पादक शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची आणि मोठी माहिती घेऊन हजर झालो आहोत. आज आपण गव्हाच्या पिकामध्ये जर सल्फरची कमतरता भासत असेल तर पिकाला सल्फर केव्हा दिले पाहिजे.

पिकाला सल्फर देण्याची योग्य वेळ कोणती. किती सल्फर दिले पाहिजे याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. कृषी तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, सल्फरच्या कमतरतेमुळे गव्हाच्या पिकाचा पानांचा वरचा भाग फिकट पिवळा पडतो.

पानांचा रंगही हलका हिरवा राहतो. त्याच्या कमतरतेमुळे वनस्पती पूर्णपणे हिरवीगार दिसत नाही. गंधकाच्या कमतरतेमुळे झाडाची देठ पातळ राहते. त्याच्या कमतरतेमुळे झाडाची उंची थांबते.

गंधकाच्या कमतरतेमुळे गव्हाचे पीक पक्व होण्यास 8 ते 10 दिवस जास्तीचा कालावधी लागतो. यामुळे जर तुमच्या पिकातही सल्फरची किंवा गंधकाची कमतरता भासत असेल तर तुम्हाला लवकरात लवकर पिकाला सल्फर द्यावे लागणार आहे.

गव्हासाठी गंधकाचे प्रमाण 

जर तुम्ही जमिनीतून गंधक देणार असाल तर बेंटोनाइट गंधक (ग्रॅन्युलर) 10 किलो प्रति एकर किंवा सल्फर पावडर 80% 3 ते 5 किलो प्रति एकर वापरन्याचा सल्ला देण्यात आला आहे.

तसेच जर तुम्ही फवारणीतून गंधक वापरणार असाल तर यासाठी गंधक पावडर ८०% प्रमाणे ७०० ते ८०० ग्रॅम सल्फर प्रति एकर वापरावे. आपण स्प्रेमध्ये द्रव सल्फर देखील वापरू शकता. पण कंपनीनुसार त्याचे प्रमाण वेगळे राहणार आहे.

गव्हाला गंधक केव्हा दिले पाहिजे

कृषी तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, गव्हामध्ये गंधकाचा वापर पहिल्या सिंचनानंतर आणि दुसऱ्या सिंचनापूर्वी करावा. म्हणजे साधारण ३० दिवसांनी गव्हाला सल्फर द्यावे.

गव्हाला गंधक लावण्याची ही सर्वोत्तम वेळ असल्याचा दावा तज्ञांनी केला आहे आहे. कारण याच वेळी गहू फुटण्यास सुरुवात होत असते. यामुळे तुम्हीही गव्हाला पहिले पाणी दिल्यानंतर सल्फरचा वापर करू शकता.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा